ETV Bharat / state

निसर्गरम्य जव्हार घनकचऱ्याच्या कचाट्यात, दुर्गंधीमुळे जनता त्रस्त

जव्हार शहराच्या भागातच घनकचरा टाकला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच दुर्गंधीयुक्त घन कचऱ्यामुळे डासांची पैदास वाढली असून भटक्या कुत्र्यांचा व जनावरांचा वावर येथे वाढला आहे. हा घनकचरा हटविण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.

palghar
जव्हार शहर घनकचऱ्याच्या कचाट्यात
author img

By

Published : Dec 9, 2019, 8:55 PM IST

पालघर - जिल्ह्यातील जव्हार शहराच्या जव्हार- नाशिक रोडवर घन कचरामुळे प्रवासीवर्ग आणि जनतेला दुर्गंधीचा सामना करावा लागतो. निसर्गरम्य ठिकाणाच्या जवळच दुर्गंधी पसरत असल्याने हा घनकचरा हटविण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.

जव्हार शहर घनकचऱ्याच्या कचाट्यात

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील डोंगरमाथ्यावर वसलले जव्हार हे पूर्वी शहर संस्थान होते. आता या शहरात नगरपरिषद आहे. या संस्थानला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झाला आहे. या ऐतिहासिक घडामोडीबरोबरच पर्यटनासाठी हवे असलेल्या निसर्गाचे कोंदन या शहराला लाभले आहे. सनसेट पॉईंट, जुना राजवाडा अशी प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत. असे असताना इथल्या निसर्गरम्य शुध्द हवेचा श्वास घनकचऱ्याच्या दुर्गंधीने नाहीसा होताना दिसत आहे. या शहराच्या भागातच हा घनकचरा टाकला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीयुक्त घन कचऱ्यामुळे डासांची पैदास वाढली असून भटक्या कुत्र्यांचा व जनावरांचा वावर येथे वाढला आहे.

हेही वाचा - भात खरेदी केंद्र सुरू करा; पालघरमधील शेतकऱ्यांची मागणी

जव्हार आणि नाशिक या मार्गांवर ये-जा करणारी वाहने, बसेस या ठिकाणहून जात असतात. घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी आग लावली जाते तेव्हा या आगीत धुराचे लोन पसरतात. ज्यामुळे वाहनांना मार्ग कठीण बनत असते आणि अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे हा घनकचरा येथून हटविण्यात यावा या मागणीला जोर पकडत आहे.

हेही वाचा - वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा मोहित राठोडने जिंकली

Intro:निसर्गरम्य जव्हार घनकच-याच्या कचाट्यात
दुर्घंधीयुक्त
घनकच-याने जनता त्रस्त

पालघर (वाडा)संतोष पाटील

पालघर जिल्ह्यातील जव्हार शहराच्या जव्हार- नाशिक रोडवर घन कचरामुळे प्रवाशीवर्ग आणि जनतेला दुर्घंधीचा सामना करावा लागतो.निसर्गरम्य ठिकाणच्या शहराजवळच दुर्घंधी पसरत आहे.
हा घनकचरा हटवावा अशी मागणी जनतेकडून केली जातेय.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील डोंगरमाथ्यावर वसलले जव्हार शहर,पूर्वी हे शहर संस्थान होते. आता या शहरात नगरपरिषद आहे.
या संस्थानला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झाला आहे.या एतिहासिक घडामोडीबरोबरच पर्यटनासाठी हवे असलेल्या निसर्गाचे कोंदन लाभले आहे.सन्सेट पॉईंट,जुन्या राजवाडा अशी प्रेक्षणीय स्थळ आहेत.
असे असताना इथल्या निसर्गरम्य शुध्द हवेचा श्वास घनकच-याच्या दुर्घंधीने नाहीसा होताना दिसत आहे.
या शहराच्या भागातच हा घनकचरा टाकला जातोय यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तसेच दुर्घंधीयुक्त घन कच-याने डासांची पैदास वाढली असुन भटक्या कुत्र्यांचा व जनावरांचा वावर येथे वाढला आहे.
जव्हार आणि नाशिक या मार्गांवर ये -जा करणारी बसेस या ठिकाणहून जात असतात.घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी आग लावली जाते.या आगीत धुराचे लोन पसरून वाहनांना मार्ग कठीण बनत असते.अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. हा घनकचरा हटविण्यात या मागणीला जोर पकडत आहे.

Body:वीडियो
घनकच-याच्या ठिकाणीचे
ओके

Conclusion:ओके
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.