ETV Bharat / state

हरित लवादाच्या आदेशानुसार 16 गावात आरोग्य शिबिरांचे आयोजन

author img

By

Published : Jan 2, 2021, 6:51 PM IST

Updated : Jan 2, 2021, 7:18 PM IST

हरित लवादाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला तीन वर्षांचा कालावधी लागला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम शालीमठ यांनी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे.

पालघर जिल्हा परिषद
पालघर जिल्हा परिषद

पालघर- जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातून होत असलेल्या प्रदुषणामुळे परिसरातील हजारो स्थानिक नागरिकांना कर्करोग, मुत्रपिंड यांचे असाध्य रोग झाले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. जानेवारी महिन्यापासून किनारपट्टीवरील 16 गावात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्र
तारापूर औद्योगिक क्षेत्र

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील काही करखान्यामधून छुप्या मार्गाने सोडल्या जाणाऱ्या रसायनामुळे परिसरातील समुद्र, खाड्यामध्ये मोठे प्रदूषण वाढत आहे. बागायती जमिनी नापीक झाल्या होत्या. 25 एमएलडी क्षमतेच्या सीईटीपी प्रकल्पामधून क्षमतेपेक्षा जास्त प्रदुषित पाणी सोडले जात होते.

हरित लवादाच्या आदेशानुसार 16 गावात आरोग्य शिबिरांचे आयोजन

हेही वाचा-मुंबईत हायप्रोफाईल पार्टीत तरुणीचा मित्रांनी केला खून

अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने दाखल केली होती जनहित याचिका-

एके ठिकाणी प्रदुषण वाढत असताना दुसरीकडे एमआयडीसीने सीईटीपीमधून थेट नवापूरच्या समुद्रात 8.1 किलोमीटर लांब पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले होते. त्यामुळे परिसरातील गावात प्रदुषणाचे प्रमाण वाढून स्थानिकांचे जीवन धोक्यात येणार असल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादात जनहित याचिका दाखल केली होती.

प्रदुषण
प्रदुषण

हेही वाचा-..त्यावेळी तुम्ही काय केले? संभाजीनगर नामांतरासाठी शिवसेनेचा भाजपावर निशाणा

प्रदूषणामुळे नागरिकांना असाध्य रोगाची लागण व पर्यावरणाची हानी-
हरित लवादात याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी एमआयडीसीमधील वाढत्या प्रदुषणाबाबत भक्कम पुरावे सादर केल्यानंतर हरित लवादाने बाधित गावांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी समुद्र, खाड्या व शेत यांचे सर्वेक्षण करून तारापूर, दांडी, नवापूर प्राथमिक केंद्रातील आजारी रुग्णांची पडताळणी केली. त्यानंतर सुमारे 14 हजार रुग्ण हे कर्करोग, मुत्रपिंड यांचे रोग तसेच त्वचा रोग, अस्थमा आदी गंभीर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती समोर आली होती. हरित लवादाने याची गंभीर दखल घेत व्याधीग्रस्तांना योग्य उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. भूगर्भातील पाण्याचे साठेही प्रदुषित झाल्याने शुद्ध पाण्याच्या पुरवठ्याची व्यवस्था उभी करण्याचे आदेशही यापूर्वी दिले आहेत.

हरित लवादाच्या आदेशानुसार राबवण्यात येणार आरोग्य शिबिरे-
हरित लवादाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला तीन वर्षांचा कालावधी लागला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम शालीमठ यांनी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. पालघर तालुक्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत तारापूर, कांबोडे, घिवली, दांडी, उच्छेळी, मुरबे, आलेवाडी, टेंभी नवापूर, सातपाटी, खारेकुरण, शिरगांव, माहिम, वडराई, केळवा आणि दादरापाडा आदी 16 गावांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे. या गावातील रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या शिबिरातून ज्या रुग्णांना गरज लागेल त्यांच्यासाठी पुन्हा आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपचार देण्यात येणार आहेत.

5 सार्वजनिक व 61 खासगी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित-
ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना स्वच्छ शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीसह स्थानिक स्वराज्य संस्था करतात. अनेक गावातील भूगर्भातील पाणीसाठे मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाले आहेत. एमआयडीसी व परिसरातील 13 ग्रामपंचायती अंतर्गत 16 गावातील 86 सार्वजनिक व 535 खाजगी पिण्याच्या पाण्याच्या स्तोत्राचे पाणी नमुने उपविभागीय प्रयोगशाळा, डहाणू येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 5 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र व 61 खाजगी पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र रासायनिकदृष्ट्या दुषित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या पाण्याच्या स्तोत्रावर पाणी पिण्यास अयोग्य असे फलक लावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Last Updated : Jan 2, 2021, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.