ETV Bharat / state

माजी आमदार पांडुरंग बरोरा विरोधात स्थानिक शिवसैनिकांचा 'यल्गार', निष्ठावंतांसोबत अन्यायाची भावना - शहापूर विधानसभा मतदारसंघ

आजवर आम्ही संघर्ष करून शिवसेना वाढवली, आता दुसराच कोणीतरी येतो आणि आम्ही त्याचे काम करावे का? असा सवाल करत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील डाहे येथील सभेत स्थानिक शिवसैनिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा शिवसेना प्रवेश, शाखा बांधणी, सदस्य नोंदणी या विषयांवर शिवसेनेच्या वाडा पुर्व विभागाकडून सभा आयोजीत करण्यात आली होती.

माजी आमदार पांडुरंग बरोरा विरोधात स्थानिक शिवसैनिकांचा 'यल्गार'
author img

By

Published : Jul 14, 2019, 9:09 PM IST

पालघर (वाडा) - शहापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार पांडूरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देवून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक शिवसैनिकांत नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर वाडा तालुक्यातील डाहे येथे आयोजीत करण्यात आलेल्या सभेत शिवसैनिकांनी आपला रोष प्रकट केला.

वाडा तालुक्यातील डाहे आणि मोज या जिल्हा परिषदेचा भाग हा शहापूर विधानसभा मतदारसंघात येतो. या भागात सेनेचे प्राबल्य आहे. या भागातून शिवसेनेचे जिल्हा परिषद व पंचायत समितीत प्रत्येकी दोन सदस्य आहेत. आमदार पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांचा विरोध होऊ लागला होता. आगामी विधानसभेत बरोरांना टिकीट मिळण्याच्या चर्चेनंतर मात्र हा विरोध अधिकच तिव्र होताना दिसत आहे.

माजी आमदार पांडुरंग बरोरा विरोधात स्थानिक शिवसैनिकांचा 'यल्गार'

"आम्ही शिवसैनिक आहोत शिवसेनेचेच काम करणार पण आगामी विधानसभा निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिकाला आमदारकीचे तिकीट द्यावे. नाहीतर काम केले जाणार नाही. तसेच पांडूरंग बरोरांना शिवसेनेत घेताना स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मते जाणून घ्यायला हवी होती. हा निर्णय लादण्यात आला असुन निष्ठावंताच्या निष्ठेची आज चेष्टा झालीय. विधानसभा निवडणूक लढावायला शिवसैनिक सक्षम नाही का ? असा सवाल करत, माजी आमदार पांडूरंग बरोरा यांच्या विरोधातील सुर वरिष्ठापर्यंत कळवा व त्यांनी याबाबत लक्ष घालावे." अशी विनंती कार्यकर्त्यांनी वरीष्ठ पदाधिकाऱ्यांकडे केली. त्यामुळे शहापूर पाठोपाठ आता वाडा भागातही बरोरांना विरोध होताना दिसत आहे.

या सभेला शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी उपजिल्हाप्रमुख अरूण पाटील, माजी तालुका प्रमुख प्रकाश पाटील, धनंजय पष्टे तसेच उपतालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, युवासेनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आम्ही आपल्या भावना वरीष्ठापर्यंत पोहचवू असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी नाराज शिवसैनिकांना दिले.

Intro:निष्ठावंताना आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट द्या,माजी पांडुरंग बरोरा नकोत, शिवसैनिकांनी घेतली वाड्यात बैठक

मातोश्रीने याबाबत निर्णय घ्यावा.

पालघर (वाडा) - संतोष पाटील

येथे आजवर सेना विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत दिसुन येतो.माञ याच मतदारसंघातील लोकप्रतिनिधी राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन सेनेत प्रवेश केला.याप्रवेशामुळे येथील
"शिवसैनिकांनी आम्ही आजवर ज्यांच्या विरोधात लढलो आणि मोठा संघर्ष करून शिवसेना वाढवली आणि आज दुसराच कोणी येतो आणि आम्ही त्याचे काम करावे.आम्ही शिवसैनिक आहोत शिवसेनेचेच काम करणार पण आगामी विधानसभा निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिकाला आमदारकीचा तिकीट द्यावे.पांडूरंग बरोरांना टिकीट देवू नका.पांडूरंग बरोराना शिवसेनेत प्रवेश घेताना स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मते जाणून घ्यायला हवी होती.तसेच हा निर्णय लादण्यात आला असुन निष्ठावंताच्या निष्ठेने आज चेष्टा झालीय.कुठला शिवसैनिक सक्षम नाही का? विधानसभा निवडणूक लढावायला?अशी प्रखर प्रतिक्रीया विभाग प्रमुख ते उपतालुका प्रमुखांनी यावेळी व्यक्त करून माजी आमदार पांडूरंग बरोरा यांच्या विरोधातील सुर वरीष्ठापर्यंत कळवावा.अशी विनंती वरीष्ठ पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. 14 जुलैला वाडा तालुक्यातील डाहे येथे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशा विषयी आणि शाखा बांधणी,सदस्यखाते नोंदणी या विषयी शिवसेनेच्या वाडा पुर्व विभागाकडून ही आयोजित सभेत चर्चा करण्यात आली.

शहापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार पांडूरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देवून शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाने सेनेतच नाराजी पसरली आहे. शहापूर पाठोपाठ शहापूर विधानसभा मतदारसंघातील वाडा भागातही त्यांना विरोध होऊ लागला आहे.
वाडा पुर्वभागातील शिवसेनेचे आजी -माजी पदाधिकारी, उपतालुक,विभाग प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी 14 जुलैच्या डाहे येथे बैठक घेऊन पांडूरंग बरोरा यांच्या विरोधात सुरू आळवून आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी शिवसेनेच्या निष्ठावंताना द्या पण पांडुरंग बरोराना टिकीट देवू नका,नाहीतर काम केले जाणार नाही.याबाबत मातोश्रीवर आमच्या भावना वरीष्ठांनी पोहचव्यात आणि मातोश्री याबाबत लक्ष घालावे अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे.त्यामुळे येथे बरोरा विरोधात वातावरण निर्माण झाले आहे.
वाडा तालुक्यातील डाहे आणि मोज या जिल्हा परिषदेचा भाग हा शहापूर विधानसभा मतदारसंघात येतो.दोन जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे आहेत.तर 49 पोलिंग हे या मतदारसंघात येतात.या भागात सेनेचे प्राबल्य आहे.तर पंचायत समितीचे दोन सदस्य आहे.अशी राजकीय परिस्थिती वाडा पुर्व भागात आहे.

यावेळी उपतालुका प्रमुख भगवान भोईर,प्रकाश आगिवले(पाटील ) सदानंद थोरात,भाऊ साबळे,जिल्हा परिषद सदस्य भालचंद्र खोडका,पंचायत समितीचे सदस्य माणिक म्हसरे, जितेंद्र कोर, गजानन म्हसकर,युवराज पाटील,तसेच युवासेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यासभेला शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते व माजी उपजिल्हाप्रमुख अरूण पाटील,माजी तालुका प्रमुख प्रकाश पाटील, धनंजय पष्टे आदी वरीष्ठांकडे नाराज शिवसैनिकांनी गाऱ्हाणे मांडले.तर त्यांनीही आम्ही आपल्या भावना वरीष्ठापर्यंत पोहचवू असे आश्वासन नाराज शिवसैनिकांना दिले. यावेळी मोठ्यासंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसैनिकांच्या या पवित्रामुळे सेनेत सद्या शहापूर बरोबर वाड्यातही नाराजीचा सूर उमटत आहे.Body:व्हिज्युअल - नाराजी सुर आळविताना शिवसैनिक Conclusion:Please पालघर (वाडा) no edit
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.