पालघर (वाडा) - वाडा तालुक्यातील 23 जून रोजी झालेल्या चार ग्रामपंचायतींचा पोटनिवडणुकीचा निकाल आज (दि.२४) वाडा तहसीलदार कार्यालयात जाहीर करण्यात आला. या निकालाला आज 11 वाजता सुरुवात झाली. यात चार ग्रामपंचायतीमध्ये प्रभागात निवडणूक झाली तर दोन ग्रामपंचायत प्रभागात बिनविरोध निवड झाली. तर उर्वरित ग्रामपंचायतीच्या प्रभागासाठी अर्ज न आल्याने तेथील निवडणूक झाली नाही.
यात गोराड ग्रामपंचायतीच्या 3 क प्रभागात अनुसूचित जमातीत महिला प्रवर्गातून सुनिता सुरेश मढवी, खुपरी ग्रामपंचायत 1 अ अनुसूचित जमाती प्रवर्गातून मुक्ता जयेश वाघ,आब्जे-वैतरणानगर ग्रामपंचायत 1 अ प्रभागात अ.जमाती जागेतून मनोज दूंदू पाटील व 2 ब प्रभागातून अ.ज महिला वेदिका विनोद म्हसकर आणि सरस्वती गणपत सरडे, कासघर ग्रामपंचायतमध्ये इतर मागास वर्गाच्या 1 अ प्रभागातून भाग्यश्री विशाल तरे आणि 3 क अ.जमाती महिला प्रवर्गातून शांता केशव नारळे या चार ग्रामपंचायत मधून हे सदस्य निवडून आले आहेत. तर हमरापूर ग्रामपंचायत 2 ब प्रभागात अ.जमाती जागेसाठी नागेश नारायण भोईर तर तुसे ग्रामपंचायतीच्या 2 ब प्रभागात सर्वसाधारण महिला जागेसाठी दामिनी दिपक साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यात काही ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारी अर्ज आले नाहीत. त्यामुळे तेथील ग्रामपंचायत निवडणूक होऊ शकली नाही. तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या 16 जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाली होती. वाडा तालुक्यातील उचाट या ग्रामपंचायतीचा सात सदस्य आणि सरपंचाची जनतेतून थेट निवड अशा जागांकरीता येथे सार्वत्रिक निवडणूक होणार होती. तर वाडा तालुक्यातील कळंभे -2,देवळी- 1,कासघर- 2,आखाडा, हमरापूर- 1,खुपरी- 1,तुसे 2, गोराड- 1,बुधावली-1,आणि आब्जे 3 अशा एकूण 16 जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम झाला आहे.
या पोटनिवडणुकीत सदस्य राजीनामा, मयत, निवडणूक खर्च,जातपडताळणी प्रमाणपत्र आदी कारणाने रिक्त पदाकरीता निवडणूक होती. सुट्टीचा दिवस वगळून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी 31 मे 2019 ते 6 जून 2019 पर्यंत 11 ते 3 वाजेपर्यंत होता. अर्जाची छाननी 7 जून 2019 रोजी छाननी संपादन पर्यंत होती.