ETV Bharat / state

गडचिंचले प्रकरण : अफवा पसरू नयेत यासाठी पोलिसांची गावोगावी जनजागृती मोहीम - पालघर पोलिसांची गोवोगावी जनजागृती मोहीम

गडचिंचले प्रकरणावरून पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या वतीने अफवांविषयी जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.

पालघर
पालघर
author img

By

Published : Apr 21, 2020, 7:57 PM IST

Updated : Apr 21, 2020, 9:39 PM IST

वाडा (पालघर) - डहाणू तालुक्यातील गडचिंचले भागात चोर असल्याच्या अफवेने तीन जणांना अमानुष मारहाण करण्यात आली, यात त्या तिघांचा मृत्यू झाला. यातील दोषींना अटक करण्यात आली आहे. ही घटना निंदनीय असून यावर देशभरातून टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या वतीने अफवांविषयी जनजागृती अभियान सुरू करण्यात आली आहे.

पालघर

पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस अशाचप्रकारे गावो-गावी जाऊन चोरांच्या अफवेविषयी गैरसमज दूर करत आहेत. कुणीही सोशल मीडिया अथवा कोणत्याही माध्यमातून अफवा पसरवू नये. कोणत्याही अनोळखी व्यक्तीस चोर किंवा दरोडेखोर समजून मारहाण न करण्याबाबत सूचना ध्वनीप्रेक्षपकाद्वारे देण्यात येत आहे. गडचिंचले प्रकरणावरून कळमखांड, कंचाड, आंबिवली, सावरोली, म्हसरोली, कुमदल, आमगाव, पांढरेपाडा, शेल्टे, गाहा, वावेघर, पाली, पोशेरी, फणसपाडा, वंगणपाडा, मांगरूळ, वरसाळे, कुडुस, चिंचघर, सापरोंडे, दिनकरपाडा, कोंढले, मागाठणे, वडवली, नारे, मुसारणे या भागात जनजागृती केली जात आहे.

पालघरमधल्या गडचिंचले या दुर्गम गावात चोर समजून तीन जणांना ठेचून मारल्याची घटना 16 एप्रिलला घडली होती. घटनेच्या दोन दिवसांनंतर बाहेर आलेल्या काही व्हिडिओंमुळे आता राजकीय वादंग उठले आहे.

Last Updated : Apr 21, 2020, 9:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.