पालघर - पिकअप वाहने, वाहनांचे स्पेअर पार्ट व जनावरे चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या. याप्रकरणी 7 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 27 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्यांनी आजवर एकूण 64 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा - Video: 'एटीएम'मध्ये हातचलाखी करत वृद्धांना लूटले
भरदिवसा पिकअप वाहनांच्या पार्किंगची माहिती घेऊन रात्री बनावट चावीच्या सहाय्याने ही वाहने चोरी करुन, भिवंडी येथील एका गॅरेजमध्ये नेली जात होती. वाहनांची नंबर प्लेट, इंजिन नंबर, चेसी नंबर नष्ट करणे. बनावट इंजिन नंबर, चेसिस नंबरच्या साह्याने या चोरीच्या गाड्या 2-3 लाखात विक्री करणाऱ्या तसेच वाहनांचे सुटे पार्ट चोरी व मोकाट जनावरांचे चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या पालघर जेरबंद केले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने 7 जणांना अटक केली आहे.
पालघर जिल्ह्यातून या आरोपींनी 51 पिकअप वाहने आणि ठाणे आयुक्त आयुक्तालय कापूरबावडी येथून 1, गुजरात राज्यातील 2, दादरा नगर हवेली येथून 1 असे एकूण 55 तसेच पाच ठिकाणाहून पार्किंगमधील चारचाकी वाहनांचे स्पेअर पार्ट तसेच चार ठिकाणाहून मोकाट जनावरांची चोरी असे एकूण 64 गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चोरी केलेल्या एकूण वाहनांपैकी 27 वाहने पोलिसांनी आरोपींकडून डिटेक्ट केली असून, त्यामध्ये 19 महिंद्रा पिकअप, 6 महिंद्रा मॅक्स, 2 महिंद्रा टोइंग व्हॅन आदी वाहनांचा समावेश आहे.याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
अटक केलेल्या 7 आरोपींनी गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यात तसेच दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातदेखील चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना 2 फेबृवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली असून, चौकशीमध्ये आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांनी चोरीस गेलेली चारचाकी वाहने व वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, चोरी करणार्या शोध घेऊन तपास करण्याच्या सूचना पोलिसांना होत्या. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत टेलर, सफौज. विनायक ताम्हणे, सुनील नलावडे नलवडे, पोहवा. दीपक राऊत, संदीप सूर्यवंशी, पोना. नरेंद्र पाटील, नीरज शुक्ता, नरेंद्र जनाठे यांच्या पथकाने केली आहे.
हेही वाचा - फेसबूकवरचे प्रेम शिक्षिकेला पडले महागात, 55 लाखांचा गंडा