पालघर - वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौरपदी प्रवीण शेट्टी यांनी निवड निश्चित झाली असून स्थायी सभापती पदी प्रशांत राऊत यांची वर्णी लागणर अशी चर्चा सुरू आहे. तसेच परिवहन सभापती पदी प्रितेश पाटील हे कायम राहणार आहेत, असे सांगितले जात आहे. २३ ऑगस्टला त्यांच्या नावांची घोषणा अधिकृतपणे करण्यात येणार आहे.
वसई विरार महानगरपालिकेचा नवा महापौर कोण होणार अखेरीस या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. महापौर रुपेश जाधव यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या महापौरपदी वसई गावातील नगरसेवक प्रवीण शेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी सेमवारी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज नगरसचिवांकडे दाखल केला आहे. इतर कोणीही अर्ज भरला नसल्याने ते बिनविरोध निवडून येतील. तसेच स्थायी समिती सभापती पदी नगरसेवक प्रशांत राऊत यांनीच अर्ज भरल्याने त्यांचीही निवड बिनविरोध होईल यात शंका नाही. तसेच परिवहन सभापती पदी पुन्हा प्रीतेश पाटील यांना संधी देण्यात आली आहे. महापालिकेच्या महापौरपदी निवडून आल्यानंतर विकास कामांवर सर्वाधिक भर देणार असल्याचे ते म्हणाले, भावी महापौर प्रवीण शेट्टी यांनी सांगितले आहे