पालघर - बिडको औद्योगिक परिसरातून आणि आसपासच्या परिसरातून पाणेरी नदीत निचरा होणाऱ्या नाल्यावर अनधिकृत बांध घालून पाणी जाण्याचा मार्ग बंद केल्याने 5 ऑगस्ट रोजी पालघरमधील भरवाडपाडा, मोहपाडा येथील घरात व जवळपासच्या काही कंपन्यांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. पालघर नगरपरिषदेने याबाबत कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने हा अनधिकृत बांध तोडला आहे. पाण्याचा मार्ग बंद करणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर पोलीस कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी आणि कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पालघरमधील बिडको औद्योगिक वसाहत आणि आसपासच्या परिसरातून पावसाचे पाणी नाल्यामार्गे नाला या मार्गे निचरा होऊन पाणेरी नदीतून वडराई खाडीमार्गे समुद्राला मिळते. 5 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे औद्योगिक परिसर भरवाडपाडा, मोहपाडा आणि आसपासच्या परिसरात नागरिकांच्या घरात कंपन्यांमध्ये पाणी सुरू करून मोठे नुकसान झाले. आजवर कितीही पाऊस झाला तरी या परिसरात पाणी साचले नव्हते. त्यानंतर पालघर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी आणि उपनगराध्यक्ष उत्तम घरत यांनी या परिसरातून जाणाऱ्या नाल्याची पाहणी केली.
हेही वाचा - डॉक्टरी पेशाला काळिमा! ओपीडी रुममध्येच डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
या पाहणी दरम्यान नाल्यात मोठमोठे दगड टाकून व इतर साहित्य टाकून पाण्याचा मार्ग बंद केल्याचे दिसून आले. त्यानंतर लगेच नगरपरिषदेने कारवाई करत जेसीबीच्या साह्याने हा अनधिकृत बांधकाम करून तोडून त्वरित पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग खुला करण्यात आला. नाल्यात अनाधिकृतरित्या बांध टाकून नदीत जाणाऱ्या पाण्याचा मार्ग बंद झाल्याने या परिसरातील वस्तीत व पाणी शिरून येथील नागरिकांचे व कारखानदारांचे नुकसान झाले.
अनधिकृतरित्या बांध घालणाऱ्या व्यक्तीची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे मुख्य अधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले. अशीच मागणी तेथील नागरीकांनी व कारखानदारांनीही केली आहे.