ETV Bharat / state

बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघाला सुरुंग लावण्यात शिवसेना महायुती यशस्वी

वसई, नालासोपारा, बोईसर या ३ विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार असून तेथे त्यांचे वर्चस्व आहे. मात्र, या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुती या मतदारसंघात सुरुंग लावण्यात यशस्वी ठरले. या भागात राजेंद्र गावित यांना मोठ्या प्रमाणात मतदान झाले.

शिवसेनेचे राजेंद्र गावित
author img

By

Published : May 25, 2019, 9:04 AM IST

Updated : May 25, 2019, 11:56 AM IST

पालघर - पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित यांना ५ लाख ८० हजार ४७९ मते मिळाली. तर महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना ४ लाख ९१ हजार ५९६ इतकी मते मिळाली. त्यामुळे राजेंद्र गावित यांचा ८८ हजार ८८३ इतक्या मताधिक्याने विजय झाला. पालघर विधानसभा मतदारसंघातून मिळालेले मोठे मताधिक्य तसेच नालासोपारा व बोईसर या बहुजन विकास आघाडीच्या वर्चस्व असलेल्या मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य यामुळे शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांना यश मिळाले आहे.

बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातून राजेंद्र गावितांना मताधिक्य

पालघर लोकसभा मतदारसंघात पालघर, डहाणू, बोईसर, विक्रमगड, वसई, नालासोपारा असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील डहाणू व विक्रमगड मतदारसंघात बहुजन विकास आघाडीला किरकोळ बढत मिळाली. मात्र, पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. शिवसेनेच्या राजेंद्र गवितांना येथून ५० हजाराहून अधिकचे मताधिक्य मिळाले.

वसई, नालासोपारा, बोईसर या ३ विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार असून तेथे त्यांचे वर्चस्व आहे. मात्र, या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुती या मतदारसंघात सुरुंग लावण्यात यशस्वी ठरले. या भागात राजेंद्र गावित यांना मोठ्या प्रमाणात मतदान झाले. यातील वसई वगळता बोईसर व नालासोपारा या दोन मतदार संघात बहुजन विकास आघाडीला अपेक्षेप्रमाणे मते मिळाली नाहीत. बोईसरमध्ये राजेंद्र गावित यांना १ लाख ४ हजार ३९२ तर बळीराम जाधव यांना ७६ हजार २२० इतकी मते पडली. येथे गावितांना २८ हजार १७२ मताधिक्य मिळाले. नालासोपारा मतदारसंघात गावित यांना १ लाख ३३ हजार २५९ मते तर जाधव यांना १ लाख ७ हजार ७२४ मते मिळाली. इथेही गावितांना २५ हजार ५३५ मताधिक्य मिळाले.

नालासोपारा, वसई भागात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार असून त्यांना आकर्षित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची प्रचार सभाही नालासोपारा येथे झाली. येथील उत्तर भारतीय मतदारांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाकडे पाहून गावित यांना मतदान केले.

बहुजन विकास आघाडीने उमेदवाराची घोषणा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी केली. तसेच चिन्ह मिळविण्यासाठी केलेल्या धडपडीतही त्यांचे प्रचारासाठी असलेले काही दिवस वाया गेले. बहुजन विकास आघाडीचे पारंपारिक चिन्ह 'शिट्टी' न मिळता त्यांना 'रिक्षा' हे चिन्ह मिळाले. चिन्ह बदलाचा फटकाही थोड्याफार प्रमाणात बहुजन विकास आघाडीला या निवडणुकीत बसला.

विधानसभा राजेंद्र गावित बळीराम जाधव

  • पालघर १ लाख ११ हजार ७९४ ५१ हजार ६९३
  • डहाणू ७२ हजार १३९ ८० हजार २८६
  • विक्रमगड ७३ हजार ७०४ ७९ हजार ४५८
  • बोईसर १ लाख ४ हजार ३९२ ७६ हजार २२०
  • वसई ८४ हजार ७०१ ९६ हजार ०१०
  • नालासोपारा १ लाख ३३ हजार २५९ १ लाख ७ हजार ७२४
  • पोस्टल मते ४९० २०५

एकूण मते ५ लाख ८० हजार ४७९ ४ लाख ९१ हजार ५९६

विधानसभा निवडणुकीत काय होणार?

पालघर लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार करता शिवसेनेने बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या बोईसर, नालासोपारा या मतदारसंघात सुरुंग लावून येथे मताधिक्य मिळवले. ही बहुजन विकास आघाडीसाठी चिंतेची बाब ठरू शकते. तसेच पालकमंत्र्यांचा मतदारसंघ असलेला विक्रमगड येथे महाआघाडीला यश मिळाले आहे. डहाणू मतदार संघात भाजपचे वर्चस्व आहे. मात्र, येथे महाआघाडीला मिळालेले यश हे भाजप महायुतीसाठी चिंतेची बाब आहे.

Intro:पालघर लोकसभा विश्लेषण
Body:पालघर लोकसभा विश्लेषण

नमित पाटील,
पालघर, दि.24/5/2019

पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित यांना 5 लाख 80 हजार 479 मते, तर महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना 4 लाख 91 हजार 596 इतकी मते मिळाली. राजेंद्र गावित यांचा 88,883 इतक्या मताधिक्याने विजय झाला. पालघर विधानसभा मतदार संघातून मिळालेले मोठे मताधिक्य तसेच नालासोपारा व बोईसर या बविआच्या वर्चस्व असलेल्या मतदार संघातून मिळालेले मताधिक्य यामुळे शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांना यश मिळाले आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात पालघर, डहाणू, बोईसर, विक्रमगड, वसई, नालासोपारा असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील डहाणू व विक्रमगड मतदारसंघात बविआला किरकोळ बढत मिळाली. मात्र पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे, शिवसेनेच्या राजेंद्र गवितांना येथून 50 हजाराहून अधिकचे मताधिक्य मिळाले.

वसई, नालासोपारा, बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व येथे त्यांचे 3 आमदार आहेत. मात्र या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुती बविआचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात सुरुंग लावण्यात यशस्वी ठरले. या भागात राजेंद्र गावित यांना मोठ्या प्रमाणात मतदान झाले. यातील वसई वगळता बोईसर व नालासोपारा या दोन मतदार संघात बविआला अपेक्षेप्रमाणे मते मिळाली नाहीत. बोईसरमध्ये राजेंद्र गावित यांना 104392 तर बळीराम जाधव यांना 76220 इतकी मते पडली, येथे गवितांना 28172 मताधिक्य मिळाले. नालासोपारा मतदारसंघात गावित यांना 133259 मते तर जाधव यांना 107724 इथेही गवितांना 25535 मताधिक्य मिळाले.

नालासोपारा, वसई भागात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार असून त्यांना आकर्षित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची प्रचार सभाही नालासोपारा येथे झाली, येथील उत्तर भारतीय मतदारांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाकडे पाहून गावित यांना मतदान केले.

बहुजन विकास आघाडीने उमेदवाराची घोषणा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी केली तसेच चिन्ह मिळविण्यासाठी केलेल्या धडपडीतही त्यांचे काही प्रचारासाठी असलेले काही दिवस वाया गेले. बविआचे पारंपारिक चिन्ह 'शिट्टी' त्यांना न मिळता त्यांना रिक्षा हे चिन्ह मिळाले. चिन्ह बदलाचा फटकाही थोड्याफार प्रमाणात बहुजन विकास आघाडीला या निवडणुकीत बसला.

विधानसभा राजेंद्र गावित बळीराम जाधव

पालघर 111794 51693
डहाणू 72139 80286
विक्रमगड 73704 79458
बोईसर 104392 76220
वसई 84701 96010
नालासोपारा 133259 107724
पोस्टल मते 490 205

एकूण मते 580479 491596

विधानसभा निवडणुकीत काय होणार ??

पालघर लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार करता शिवसेनेने बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या बोईसर, नालासोपारा या मतदारसंघात सुरुंग लावले असून येथे मताधिक्य मिळवले, ही बविआसाठी चिंतेची बाब ठरू शकते. तसेच विक्रमगड व डहाणू या दोन मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे मात्र येथे महाआघाडीला यश मिळालेले ही महायुतीसाठी चिंतेची बाब आहे.

Conclusion:
Last Updated : May 25, 2019, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.