ETV Bharat / state

Palghar District Year Ender 2021 : नौदल सैनिक अपहरण अन् हत्या, तौक्ते चक्रीवादळ, कारखान्यांतील स्फोटांसह 'या' घडामोडींमुळे चर्चेत राहिला पालघर जिल्हा - Vaccine with Dron

2021 च्या सुरुवातीलाच ( Palghar District Year Ender 2021 ) पालघरमध्ये नौदल सैनिक अपहरण समोर आले. मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील वादग्रस्त साक्षीदार किरण गोसावी याचे पालघरमधील फसवणुकीचे प्रकरणही देशभर गाजले. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पालघर जिल्ह्यातील जाणारा बुलेट ट्रेनचा मार्ग काहीसा मोकळा झाल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीण भागात दळणवळणाची असलेली अपुरी सुविधा लक्षात घेता ड्रोनद्वारे लस वाहतूक करण्याचा अनोखा प्रयोग जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. याच वर्षात पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर उभारण्यात आलेल्या भव्य जिल्हा मुख्यालयाचा शुभारंभ झाल्याने पालघर जिल्ह्याच्या विकासाला यामुळे चालना मिळेल असा आशावाद देखील व्यक्त करण्यात येत आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 28, 2021, 7:31 PM IST

पालघर - जिल्ह्यात 2021 च्या सुरुवातीलाच ( Palghar District Year Ender 2021 ) नौदल सैनिक अपहरण समोर आले. मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील वादग्रस्त साक्षीदार किरण गोसावी याचे पालघरमधील फसवणुकीचे प्रकरणही देशभर गाजले. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पालघर जिल्ह्यातील जाणारा बुलेट ट्रेनचा मार्ग काहीसा मोकळा झाल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीण भागात दळणवळणाची असलेली अपुरी सुविधा लक्षात घेता ड्रोनद्वारे लस वाहतूक करण्याचा अनोखा प्रयोग जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. याच वर्षात पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर उभारण्यात आलेल्या भव्य जिल्हा मुख्यालयाचा शुभारंभ झाल्याने पालघर जिल्ह्याच्या विकासाला यामुळे चालना मिळेल असा आशावाद देखील व्यक्त करण्यात येत आहे.

  1. नौदल सैनिकाचे अपहरण व खून प्रकरण - पालघर जिल्ह्यातील वेवजी येथील जंगलात 5 फेब्रुवारी, 2021 रोजी अपहरण करून अज्ञातांनी नौदल सैनिक सुरजकुमार दुबे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना समोर आली. मात्र, नौदल सैनिक सुरजकुमार दुबे यांचे खंडणीसाठी अपहरण व हत्या झाली नसून ही संपूर्ण घटना त्याने स्वतः केलेला बनाव असल्याचे तपासात उघड झाले. त्यांनी घेतलेले कर्ज आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही बाब घरच्यांपासूनही लपवली असल्याचे उघड झाले. कर्ज आणि शेअर मार्केटमधील नुकसान या आर्थिक विवंचनेतून सुरजकमार दुबे यांनी अपहरण व हत्येचा बनाव केल्याची माहिती पालघर पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पालघर जिल्ह्यातील 100 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची 10 पथके विविध ठिकाणी तैनात करण्यात आली होती.
    नौदलातील सैनिक
    नौदलातील सैनिक
  2. तौक्ते चक्रीवादळ धडकल्यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात झाले मोठे नुकसान - 16 व 17 मे रोजी राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळ ( Tauktae Cyclone ) धडकले. यामुळे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीलाही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तौक्ते वादळामुळे पालघर जिल्ह्यात 3 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले व 14 हजार 348 शेतकऱ्यांचे 6 हजार 57 हेक्टर क्षेत्रावर भातपीक, फळबागा आदींचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. आंबा, चिकू, केळी फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान सहन करावे लागले. 8 जनावरही या वादळात मृत्युमुखी पडली होती. जिल्ह्यातील बऱ्याच भागात घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. कच्ची व पक्की घरे मिळवून पूर्णतः व अंशतः एकूण 14 हजार 407 घरांचे नुकसान झाले. मासेमारी करणाऱ्या 28 बोटींचे अंशतः तर 25 बोटींचे पूर्णता नुकसान झाले व 266 मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान या वादळात झाले. चार दुकानदारांचे व 7 टपरीधारकांचे तर कुक्कुट पालन करणाऱ्या व्यावसायिकांच्या 19 शेडचे नुकसान या तौक्ते चक्रीवादळामुळे झाले.
    पिकांचे झालेले नुकसान
    पिकांचे झालेले नुकसान
  3. तौक्ते चक्रीवादळामुळे समुद्रात जहाजात अडकलेल्या 137 जणांचे बचाव कार्य - पालघरमधील समुद्रात रायगडच्या बाजूने गाल कन्स्ट्रॅक्टरचे ( ONGC ) एक जहाज येत होते. हे जहाज पालघरच्या वडराई भागात वादळी वाऱ्यामुळे भरकटले. त्यामुळे ते जहाज खडकात अडकले. या जहाजात 137 जण अडकल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलाला ( Indian Coast Guard ) मिळाली. त्यानंतर तटरक्षक दलाकडून या 137 जणांना समुद्रातून बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य ( Rescue Operation by Indian Coast Guard ) सुरू करण्यात आले. तटरक्षक दलाच्या 3 हेलिकॉप्टरच्या सहायाने या जहाजावर अडकलेल्या 137 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
    भरकटलेले जहाज
    भरकटलेले जहाज
  4. डेहणे येथील फटाके कंपनीत स्फोट - डहाणू तालुक्यातील वाणगाव डेहणे या गावाशेजारील जंगलात असलेल्या विशाल फायर वर्क्स या फटाके तयार करणाऱ्या कंपनीत वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यावेळी फटाक्यांसाठी साठवलेल्या दारूला आग लागल्याने भीषण स्फोट ( Blast at Fireworks Company at Dehne ) झाला. त्यानंतर तासाभरात 7 ते 8 भीषण स्फोट झाले. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की या आवाजाने 20 ते 25 किलोमीटरचा परिसर हादरला. या स्फोटामध्ये 10 जण जखमी झाले. स्फोटानंतर त्वरितच प्रशासन, पोलीस व अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की या गावात शेजारील गावांतील घरांना तडे गेले असून या कारखान्याचे पत्रे तसेच जवळ असलेली वाहने स्फोटामुळे दूरवर फेकल्या गेल्या. या प्रकरणी कारखान्याचे मालक नरेश कर्णावट (रा. डहाणू), उर्मिला जेठामल शहा (रा. मुंबई) आणि वेल्डिंगचे काम करणारा कारागीर नवदीप लोटे यांच्यावर गुन्हा दाखल आला.
    प्रातिनिधीक छायाचित्र
    प्रातिनिधीक छायाचित्र
  5. पालघर जिल्हा मुख्यालय उद्घाटन - पालघर जिल्ह्याची निर्मिती होताच नगर विकास विभागाने सिडकोला पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रशस्त इमारत उभारण्यात यावी, असे आदेश देण्यात आले. सिडकोच्या यंत्रणेने त्यासाठी अद्यावत नियोजन करुन पाच इमारतींचे डिझाईन तयार केले त्यामध्ये इमारतीच्या उत्कृष्ट वास्तुकलेचा वापर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीचे अंतर्गत कामे रंगरंगोटीसह पूर्ण करण्यात आली आहेत. या इमारतीच्या कामास 21 ऑगस्ट, 2017 रोजी सुरुवात करण्यात आली. सिडकोला पालघर ( कोळगाव ) येथील दुग्धविकास विभागाची एकूण 440 हेक्टर जमीन देण्यात आली असून त्यापैकी 103 हेक्टर जमिनीवर सध्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हापरिषद या प्रमुख विभागाच्या इमारतीसह अन्य विभागासाठी एक प्रशासकीय इमारत, असे पालघर जिल्हा मुख्यालय उभारण्यात आले. या इमारतींसाठी 307 कोटी 65 लाख रुपये खर्च आला. या पालघर जिल्हा मुख्यालयाचे 19 ऑगस्ट, 2021 रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
    पालघर जिल्ह्याची नवीन प्रशासकीय इमारत
    पालघर जिल्ह्याची नवीन प्रशासकीय इमारत
  6. बुलेट ट्रेन प्रकल्पाला जिल्ह्यातील बारा पैसा गावांनी दिला हिरवा कंदील - मोदी सरकारच्या महत्वकांशी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघरमधून जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ( Bullet Train ) प्रकल्पाला आता पुन्हा काहीशी गती मिळाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या प्रकल्पासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ( National High Speed Rail Corporation Limited ) ला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्या दरम्यान पालघर जिल्ह्यातील 12 पैसा गावांनी बुलेट ट्रेन प्रकल्पला हिरवा कंदील दिला. ग्रामसभेमध्ये पालघरमधील या 12 गावांनी आपली जमीन प्रकल्पाला देण्यास मंजुरी दिली. 12 पैसा गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आतापर्यंत 19 पैसा गावांनी बुलेट ट्रेन या प्रकल्पासाठी ठराव मंजूर केले. पालघर तालुक्यातील अजूनही 11 पैसा गावांची मंजुरी येण्याचे बाकी आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, पालघर आणि वसई, अशा चार तालुक्यांतील तब्बल 71 गावांमधून या बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार आहे. यापैकी आतापर्यंत 60 गावांनी या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आपले संमती दिली असून 11 पैसा गावांचा अजूनही या बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध आहे.
    बुलेट ट्रेन संग्रहित छायाचित्र
    बुलेट ट्रेन संग्रहित छायाचित्र
  7. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात जिल्ह्यातील मच्छिमाराचा मृत्यू प्रकरण - 7 नोव्हेंबरला गुजरात राज्यातील जलपरी या बोटीवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे (वय 32 वर्षे) हा तरुण जागीच ठार झाला. गुजरात, वनग बारा येथील जलपरी बोटीत खलाशी कामगार म्हणून काम करत असलेला श्रीधर हा ओखा-पोरबंदर भागातील समुद्रात बोटीवर मासेमारी करत असताना पाकिस्तान ट्रॉलर्समधून आलेल्या सैनिकांनी गोळीबार केला. या गोळीबारात वडराई येथील मच्छिमार श्रीधर चामरे यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचप्रमाणे बोटीचे कॅप्टन तांडेल यांना गोळी लागल्याने जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संपूर्ण घटनेचा मच्छीमार बांधवांनी निषेध व्यक्त करत चौकशीची मागणी केली.
    श्रीधर चामरे
    श्रीधर चामरे
  8. किरण गोसावी फसवणूक प्रकरण - पालघरमधील एडवण येथील दोन तरुणांना परदेशात नोकरी लावून देतो, सांगून किरण गोसावीने ( Kiran Gosavi ) 1 लाख 65 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. क्रुझ ड्रग्स प्रकरणात ( Cruise Drug Case ) आर्यन खानसोबत ( Aryan Khan News ) सेल्फी घेत असलेला किरण गोसावीला उत्कर्ष तरे यांनी पाहिल्यावर आपली फसवणूक केलेली व्यक्ती हीच आहे, याची खात्री त्यांना पटली. त्यानंतर दोन्ही तरुणांनी तत्काळ केळवे पोलीस ठाणे गाठून आपली फसवणूक करणाऱ्या गोसावी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर केळवे पोलीस ठाण्यात किरण गोसावी विरोधात भा.दं.वि.चे कलम 420, 406, 465, 467, 471 कलमान्वये गुन्हा दाखल झाला.
    आरोपीसह पोलीस
    आरोपीसह पोलीस
  9. जव्हार, मोखाडासारख्या अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे लस वाहतूक - सध्या संपूर्ण जगात वेगवेगळया क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपली कामे जलद व सुलभरित्या केली जात आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा सारख्या अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात कोरोना लसीचे डोस पोहोचविण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे लस ( Vaccine with Drone ) पोहोचवण्याचा अनोखा प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लू इन्फिनीटी इनोव्हेशन लॅब व आय. आय. एफ. एल. फाउंडेशनच्या मदतीने राबविण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा सारख्या अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात वाहतूक पूरक सुविधा नसल्याने कोरोना लसीचे डोस पोहोचविण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात लस पोहोचवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात येत असून आता कोरोना प्रतिबंधात्मक लस ड्रोनच्या मदतीने अतिदुर्गम भागातील गावांपर्यंत पोहोचवली जात आहेत.
    ड्रोनद्वारे लस पुरवठा करताना
    ड्रोनद्वारे लस पुरवठा करताना
  10. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील स्फोट - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ( Tarapur Industrial Area ) प्लॉट जे-1 मधील जखारिया इंडस्ट्रीज या कापडाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत 4 ऑगस्ट सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला होता. स्फोटाच्या आवाजाने तीन ते चार किलोमीटर परिसर हादरला होता. यानंतर कंपनीत मोठी आग लागली कंपनीचा मोठा भाग जळून खाक झाला. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू तर 5 कामगार जखमी झाले. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनी व कारखान्यांत स्फोट व आग लागण्याचे अनेक प्रकार 2021 या वर्षात घडले असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.
    कारखान्यात लागलेली आग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.