ETV Bharat / state

Palghar Crime : आईवर कुऱ्हाडीने वार करून अल्पवयीन मुलाकडून खून, तपासात सांगितले धक्कादायक कारण - अल्पवयीन मुलाकडून आईचा खून

चारित्र्यावर संशय घेऊन अल्पवयीन मुलाने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना वसई पूर्वमधील एका गावात घडली आहे. ही घटना रविवारी रात्री घडली आहे.

Palghar Crime
Palghar Crime
author img

By

Published : Aug 22, 2023, 1:25 PM IST

Updated : Aug 22, 2023, 2:06 PM IST

वसई : वसई पूर्वेतील एका महिलेचा स्वतःच्या पोटच्या मुलाने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहत्या घरात मुलानं हे भयानक कृत्य केलं असल्याची माहिती पुढे आली आहे. ही हत्या आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन केल्याचं मुलानं कबूल केले. या प्रकरणी पुढील तपास मांडवी पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत वसई पूर्वेतील एका ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून महिला निवडून आली होती. मुलाला आपली आई कोणाशी तरी फोनवर नेहमी बोलत असल्याने आवडत नव्हतं. आईचे कोणाशी तरी संबंध असावेत असा त्याचा संशय बळावला होता.

झोपलेल्या महिलेची हत्या- महिला वालीव परीसरात एका कारखान्यात नोकरीला जात होती. रविवारी सुट्टीला दिवशी ही महिला घरी होती. रात्रीचे जेवण करून महिला आपल्या खोलीत झोपी गेली. यावेळी तिच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं झोपलेल्या आईवर कुऱ्हाडीने जोरदार तीन वार केले. त्यानंतर तो घराबाहेर पळून गेला. या घटनेनंतर काही वेळाने बाहेर असलेला महिलेचा पती घरी आल्यावर त्यानं आपल्या पत्नीला जखमी अवस्थेत बघितले.

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली-महिलेच्या पतीने तिला उपचारांसाठी जवळचे ठिकाण म्हणून भिवंडी येथील रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद मांडवी पोलिसात होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविले. पोलिसांनी प्रथम तिच्या पतीला व मुलाला ताब्यात घेतले. मुलाची चौकशी केली असता त्याने आईची हत्या केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे मांडवी पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले.

ठाण्यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या- चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर लोखंडी पहारने हल्ला करून पत्नीला जागीच ठार मारल्याची नुकतेच धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर पती फरार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी आरोपीला अटक केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, चारित्र्याचा संशय घेणाऱ्या पतीची दोन्ही कुटुंबाकडून समजूत काढण्यात आली होती. त्यानंतर पतीने काही दिवसातच पत्नीची हत्या केली.

हेही वाचा-

  1. Thane crime: सोडचिठ्ठी देण्यापूर्वीच पत्नीला अचानक संपविले..फरार पतीला अटक
  2. Husband Suicide Case Thane: पत्नीवर संशय, मारहाण पण आत्महत्या मात्र पतीची; जाणून घ्या घटनेचे रहस्य...

Last Updated : Aug 22, 2023, 2:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.