पालघर (वाडा) - पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्गाचा खरीप हंगाम अडचणीत सापडला होता. मात्र, अशातच जिल्ह्यात आजपासून (बुधवार) कमी अधिक प्रमाणात पावसाने संततधार पकडल्याने बळीराजा सुखावला आहे.
जिल्ह्यात पावसाअभावी खरीप हंगाम अडचणीत सापडला होता. शेतकरी वर्गाची पावसाअभावी भात लागवडीची कामे थांबली होती. तर काही लागवड केलेल्या भात पिकांना पावसाची गरज होती. आज पावसाने हजेरी लावल्याने वाडा तालुक्यातील शेतकरी वर्गाने रखडलेल्या भात लागवडीच्या कामांना सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी अतिपावसामुळे भातशेती कामे रखडली होती. मात्र, तरीही या पावसामुळे खरीप हंगामाला सद्यस्थितीत दिलासा दिला आहे.