पालघर नायगावमध्ये बुधवारी संध्याकाळी शालेय विद्यार्थ्यांना Our Lady of Velankani School Bus घेऊन जाणारी बस खड्ड्यात कलंडली. मात्र, चालकाने बसवर नियंत्रण मिळवल्याने अपघात टळला. स्थानिकांनी आपत्कालीन दरवाज्यातून मुलांना सुखरूप बाहेर Children Out Safely Through Emergency Door काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मुलांना ताबडतोब दुसऱ्या बसने घरी पाठवण्यात आले.
मुलांना घरी सोडण्यास निघालेली बस नायगाव पूर्वेच्या भागातून टीवरी फाटा रस्ता गेला आहे. या रस्त्यावरून अवर लेडी ऑफ वेलंकनी या शाळेची बस शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. मात्र, याचदरम्यान सनटेकजवळील भागात पोहचताच वाहनचालकाचा अंदाज चुकल्याने रस्ता सोडून ही रस्त्याच्या कडेला गेली. यावेळी रस्त्याच्या कडेला खोलगट भागामुळे बसचा एका बाजूला तोल गेला. त्यामुळे बस एका बाजूला कलंडली.
बसमध्ये 50 हून अधिक विद्यार्थी, सुदैवाने बचावले बस एकाच बाजूला झुकल्याने त्यात असलेली शाळकरी मुले ही घाबरली होती. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बसमध्ये असलेल्या शाळकरी मुलांना सुखरूप बाहेर काढले. जवळपास यात ५० हून अधिक शाळकरी मुले होती. सुदैवाने ही बस कलंडली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. तातडीने दुसरी बस बोलावून या मुलांना बसवून घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली.