ETV Bharat / state

हजारो मजुरांची वसईच्या सनसिटी मैदानावर गर्दी; गावी परतण्यासाठी जीवघेणा 'संघर्ष' - लेटेस्ट न्यूज इन पालघर

मीरा-भाईंदर व वसई-विरार परिसरातील हजारो मजूर वसई पश्चिमेकडील सनसिटी मैदानावर जमा झाले आहेत. मजुरांना गावी पोहोचण्यासाठी हे मैदान शेवटचे आशेचे किरण बनले आहे. खिशात पैसे व हाताला काम नसल्याने राहत्या घराला रामराम ठोकून हे मजूर गावी जाण्याच्या आशेवर या मैदान परिसरात ट्रेनची वाट बघत आहेत.

plg
मजुरांना हाकलताना पोलीस
author img

By

Published : May 26, 2020, 10:29 AM IST

पालघर - उत्तरप्रदेश येथे जाणाऱ्या मीरा-भाईंदर व वसई-विरार परिसरातील हजारो मजूर वसई पश्चिमेकडील सनसिटी मैदानावर जमा झाले आहेत. मजुरांना गावी पोहोचण्यासाठी हे मैदान शेवटचे आशेचे किरण बनले आहे. हातात पैसे नसताना घरमालकाने बाहेर काढल्यामुळे गावी पोहोचणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे हे मजूर उन्हात बसून ट्रेनची वाट बघत आहेत. घरी पोहोचण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो ते या वसईतील दृश्यातून समोर येत आहे.

हजारो मजुरांची वसईच्या सनसिटी मैदानावर गर्दी; गावी परतण्यासाठी जीवघेणा 'संघर्ष'

वसईतून १ मे पासून उत्तरप्रदेश, बिहार येथे जाणाऱ्या 11 ट्रेन सोडण्यात आल्या असून आणखीन आठ ट्रेन सोडण्यात येणार आहेत. या ट्रेन कधी सोडणार याबाबतची काही माहिती प्रवाशांना दिली गेली नसल्याने सनसिटी मैदानात मजुरांची गर्दी झाली आहे. खिशात पैसे व हाताला काम नसल्याने राहत्या घराला रामराम ठोकून हे मजूर गावी जाण्याच्या आशेवर या मैदान परिसरात ट्रेनची वाट बघत आहेत.

येथून पुन्हा घरी जयायचे तर घरीही जाता येणार नाही. शिवाय गावी परतण्यासाठी ट्रेनही उपलब्ध नसल्याने किती दिवस अशी प्रतीक्षा करायची, असा प्रश्न या मजुरांना सतावत आहे. दरम्यान आज दुपारी या मजुरांना पोलीस प्रशासनाकडून हाकलून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरी इथून न हलण्याची तयारी मजुरांनी दाखविली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.