ETV Bharat / state

. . अखेर गावी परतण्याची इच्छा राहिली 'अपूर्ण', वसईच्या सनसिटी मैदानात मजूर महिलेचा 'करुण अंत' - लेटेस्ट न्यूज इन पालघर

उत्तरप्रदेशातील आपल्या गावी परतण्यासाठी वसईतील सनसिटी मैदानात आलेल्या महिलेचा मृत्यू झाला. उत्तरप्रदेशातील घरी जाण्याची या महिलेची इच्छा अधुरीच राहिली आहे. त्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Train
रेल्वेची वाट पाहत ताटकळत बसलेले मजूर
author img

By

Published : May 27, 2020, 11:45 AM IST

पालघर - सनसिटी मैदानावर जमलेल्या हजारो मजुरांमधील महिलेचा करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विधोतमा शुक्ला ( वय ५८ वर्ष ) असे मृत महिलेचे नाव आहे. उत्तरप्रदेशातील आपल्या गावी परतण्यासाठी वसईतील सनसिटी मैदानात ही महिला आपल्या मुलासोबत आली होती.

नालासोपारा येथे राहणारे विनय शुक्ला हे आपली पत्नी, आई व मुलांसह उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथे जाण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सनसिटी मैदानात आले होते. दोन वाजेपर्यंत हे कुटुंब रेल्वेच्या प्रतीक्षेत ताटकळत बसले होते.

रेल्वेची वाट पाहत ताटकळत बसलेले मजूर

विधोतमा यांना डायबेटीस व ब्लडप्रेशरचा त्रास असल्याने कडक उन्हामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यातच त्या जागीच बेशुद्ध झाल्या. त्यांना रुग्णवाहिकेतून वसईच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून या महिलेला मृत घोषीत केले. आपल्या गावी परतण्याची या महिलेची इच्छा अखेर अधुरीच राहिल्याने येथील नागरिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.