पालघर - डहाणू-चारोटी रोडवर कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाणगावजवळील वाढवण येथील मिरचीच्या वाडीत काम करून तलावली येथे घरी परतत असताना रानशेत येथे हा अपघात घडला. जखमींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.