ETV Bharat / state

बोईसरमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण, निकटच्या संपर्कातील व्यक्ती विलगीकरणात दाखल

संबंधित महिलेची शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र, त्यापूर्वी तिची कोरोनाचा चाचणी करण्यात आली. रविवारी अहवाल प्राप्त झाले असता त्यामध्ये ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. तिच्या जवळच्या संपर्कात असलेल्या ५ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.

corona update palghar  palghar corona positive patient  boisar corona positive patient  पालघर कोरोना पॉझिटिव्ह केसेस  पालघर कोरोना अपडेट  बोईसर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
बोईसरमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण, निकटच्या संपर्कातील व्यक्ती विलगीकरणात दाखल
author img

By

Published : May 18, 2020, 9:06 AM IST

पालघर - तालुक्यातील बोईसर येथे रविवारी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. ओसवाल येथील बेटेगाव परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

संबंधित महिलेची शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र, त्यापूर्वी तिची कोरोनाचा चाचणी करण्यात आली. रविवारी अहवाल प्राप्त झाले असता त्यामध्ये ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. तिच्या जवळच्या संपर्कात असलेल्या ५ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तसेच महिला राहत असलेली इमारत देखील सील करण्यात आली.

यापूर्वी जिल्ह्यातील वाडा तालुक्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये ३३ वर्षीय पुरुषाचा समावेश असून तो वाडा येथील रहिवासी आहे. उत्तर प्रदेश येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता, पॉझिटिव्ह आढळून आला. २२ वर्षीय महिला वाडा येथील रहिवासी असून रत्नागिरी येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आली. १२ वर्षीय स्त्रीचा पनवेल येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.