ETV Bharat / state

'त्या' उर्वरित ७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही - पालघर कोरोना रुग्ण

जिल्ह्यात आजवर परदेशातून आलेल्या ९६ प्रवाशांचा जिल्हा प्रशासनामार्फत शोध घेण्यात आला. यापैकी १९ जणांचा १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण झाला आहे.

palghar corona
पालघर कोरोना
author img

By

Published : Mar 17, 2020, 10:58 PM IST

पालघर - जिल्ह्यात आजवर परदेशातून आलेल्या ९६ प्रवाशांचा जिल्हा प्रशासनामार्फत शोध घेण्यात आला. यापैकी १९ जणांचा १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण झाला आहे. यापैकी ११ प्रवाशांमध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती ४ प्रवासी निगेटिव्ह असल्याचा अहवाल दोन दिवसांपूर्वीच आला होता. आज(मंगळवार) उर्वरित ७ प्रवाशांचादेखील तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात सध्यस्थितीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले आहे.

कैलास शिंदे - जिल्हाधिकारी, पालघर

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पालघर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या वस्तूंचे दुकाने, बियर/वाईन शॉप, सर्व देशी दारूचे दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यावेळी अन्य जीवनावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

या अगोदरच जिल्ह्यातील मॉल, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे, समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, तलाव, किल्ले इत्यादी ठिकाणी ३१ मार्चपर्यंत फौजदरी प्रक्रिया संहिता 144 कलमान्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रेशनिंगचे बायोमेट्रिक पद्धतीने वाटप होणार नसून आधारकार्ड बघून रेशनिंग दिले जाणार आहे. बायोमेट्रिक पद्धतीमुळे ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाची लागण होण्याची शक्यता लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी शिंदे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.