ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये मंगळवारी आढळले 139 नवे कोरोना रुग्ण; 4 जणांचा बळी

वसई - विरारमध्ये मंगळवारी एकाच दिवसात 139 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. तर आज (मंगळवारी) दिवसभरात 4 रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

वसई विरारमध्ये मंगळवारी आढळले 139 नवे कोरोना रुग्ण; 4 जणांचा बळी

author img

By

Published : Jun 23, 2020, 9:51 PM IST

पालघर - येथील संपूर्ण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. वसई - विरारमध्ये मंगळवारी एकाच दिवसात 139 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. तर आज (मंगळवारी) दिवसभरात 4 रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मंगळवारी आलेल्या कोरोना चाचणीच्या अहवालानंतर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 348 वर जाऊन पोहोचली आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 93 रुग्णांचा कोरोनामुळे उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत 1 हजार 370 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, सध्या अ‌ॅक्टीव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 885 असून त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.