पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासामधअ् 46 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या 46 कोरोना रुग्णांपैैकी 36 रुग्ण पालघर तालुक्यातील, 3 वसई ग्रामीण, 2 डहाणू तालुक्यातील, 4 वाडा तालुक्यातील व एक रुग्ण मोखाडा तालुक्यातील आहे. 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 652 झाली असून, 12 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 321 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 319 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्याची परिस्थिती -
राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना सोमवारी ३ हजार ७२१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ६१ हजार ७९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील १९६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून कोरोनामुक्तांची एकूण संख्या ६७ हजार ७०६ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सोमवारी ६२ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.