पालघर - वाडा तालुक्यात आज 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 20 वर गेली आहे. यातील पाचजण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बुरपूले यांनी दिली.
नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भावेघर गावात एका पुण्यातून आलेल्या व्यक्तीचा समावेश आहे. किरवलीचे 5, मोहट्याचा पाडा येथील 3 आहेत. हे सर्व हायरिस्क रुग्ण आहेत. चिंचघर पाडाचे 2 पॉझिटिव्ह , वाणी आळीत एक पॉझिटिव्ह आहे. या सर्व भागांतील गाव किंवा पाडे प्रतिबंधीत करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संजय बुरपूले यांनी दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यापासून बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत असून प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण संख्या वाढत असून यात अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर,नर्स,आणि पोलिस कर्मचारी,सुटलेले कैदी आणि अती संपर्क असलेले व्यक्तीचा समावेश आहे.