ETV Bharat / state

राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे पालघर तहसीलदार कार्यालयासमोर डफडा बजाव आंदोलन - राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे

अनुसूचित जमातीतील (एस.टी) बंजारा समाजाचे आरक्षण हे ७ वरून १४ टक्के करून त्याचे उपवर्गीकरण करून देण्यात यावे, क्रिमिलेयरची अट रद्द करावी, बढतीमध्ये आरक्षण देण्यात यावे यासह इतर प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा टायगर्सने केली आहे.

डफडा बजाव आंदोलन
डफडा बजाव आंदोलन
author img

By

Published : Oct 15, 2020, 4:19 PM IST

पालघर- बंजारा आरक्षण यासह विविध मागण्यासांठी आज राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या वतीने पालघर तहसीलदार कार्यालयासमोर डफडा बजाव आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर, मागण्यांबाबत पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

डफडा बजाव आंदोलन

अनुसूचित जमातीतील (एस.टी) बंजारा समाजाचे आरक्षण हे ७ वरून १४ टक्के करून त्याचे उपवर्गीकरण करून देण्यात यावे, क्रिमिलेयरची अट रद्द करावी, बढतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेचा लाभ मिळावा, राज्यातील संपूर्ण तांड्यास महसुली दर्जा मिळावा, भारतातील ११ कोटी लोकसंख्या असलेल्या गोरबोली भाषेला राष्ट्रीय भाषा सूचित दर्जा देण्यात यावा, या मागण्या आहेत. प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा टायगर्सने केली आहे.

हेही वाचा- पाण्यावर तरंगू लागलेय भातपीक, जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.