ETV Bharat / state

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील बेकायदेशीर बांधाकामावर नाना पटोलेंचे कारवाईचे निर्देश - तारापूर अणुऊर्जा प्रकल्पा बद्दल बातमी

पालघर जिल्ह्यातील तारापूर अणुर्जा प्रकल्पाच्या परिसरातील 72 एकर जमिनीवर बेकायदेशिर बांधकाम केल्याचे समोर आले आहे. या बांधकामावर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानससभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

Nana Patole directs action against illegal construction at Tarapur Atomic Energy Project
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील बेकायदेशीर बांधाकामावर नाना पटोलेंचे कारवाईचे निर्देश
author img

By

Published : Jan 8, 2021, 8:34 PM IST

पालघर - जिल्ह्यातील मौजे तारापूर येथीलतारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरातील 72 एकर सरकारी जमिनीवर बेकायदेशररित्या केलेल्या हस्तांतरण आणि अनधिकृत बांधकामा संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने कारवाई करण्यात यावी आणि कारवाईचा अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणी 7 जानेवारी 2021 ला विधान भवन मुंबई येथे बैठक झाली.

विधान भवन मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या समोर पालघर जिल्ह्यातील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाच किलोमीटर अंतरावर कोणतेही निवासस्थान बांधकाम करण्यास परवानगी नसताना त्या ठिकाणी बांधकाम होणे गंभीर बाब तारापूर विकास समितीचे अध्यक्ष जितेंद्र राऊळ किसान काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष पुंडलीक घरत तसेच उमेश पाटील आदीसह अधिकारी यांच्या समवेत नागरिकानी निदर्शनास आणून दिली.

यावर विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले ही यांनी सरकारी जमिन असून, येथे अशाप्रकारे बांधकाम करणे कायदेशीर नाही. यामुळे संबंधित विकासकावर आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी. यासंदर्भात अटी व शर्तीचा भंग झाल्याचे निदर्शनास येत असून, याबाबत तातडीने कारवाई करून, कारवाईचा अहवाल एका महिन्यात सादर करावा असे निर्देश अध्यक्ष पटोले यांनी दिले. या बैठकीस कोकण विभागाचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी माणिक गुरसाळ, प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर, महसुल विभागाचे उपसचिव अजित देशमुख हे अधिकारी उपस्थित होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.