ETV Bharat / state

Narcotics Recovered Nalasopara: नालासोपाऱ्यात अमली पदार्थनिर्मिती; मुंबई क्राइम ब्रँचची मोठी कारवाई

विविध गुन्ह्यांकरता कुख्यात असलेले नालासोपारा आता अमली पदार्थनिर्मितीचा केंद्रबिंदू ठरतेय की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. ( Narcotics Recovered Nalasopara ) मुंबई क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थविरोधी सेलने नुकत्याच केलेल्या कारवाईत या नालासोपारा पश्चिम सीताराम बिल्डिंग चक्रधर नगर परिसरातून तब्बल 1,400 कोटी रुपये किमतीचे 700 किलो मेफेड्रोन जप्त केले आहे. त्यामुळे नालासोपारा हे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

नालासोपाऱ्यात मुंबई क्राइम ब्रँचची मोठी कारवाई

author img

By

Published : Aug 4, 2022, 7:29 PM IST

नालासोपारा (पालघर) - विविध गुन्ह्यांकरता कुख्यात असलेले नालासोपारा आता अमली पदार्थनिर्मितीचा केंद्रबिंदू ठरतेय की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थविरोधी सेलने नुकत्याच केलेल्या कारवाईत या नालासोपारा पश्चिम सीताराम बिल्डिंग चक्रधर नगर परिसरातून तब्बल 1,400 कोटी रुपये किमतीचे 700 किलो मेफेड्रोन जप्त केले आहे. त्यामुळे नालासोपारा हे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ( Seized Narcotics From Nalasopara Area ) या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

नालासोपाऱ्यात मुंबई क्राइम ब्रँचची मोठी कारवाई

सर्वात मोठी अंमली पदार्थ साठा - नालासोपारा येथील एका औषध निर्मिती युनिटवर छापा टाकल्यानंतर तेथे प्रतिबंधित औषध मेफेड्रोन तयार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. ( Mumbai Crime Branch ) या प्रकरणी चार आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तर, नालासोपारा येथे एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे. अलीकडच्या काळात पकडलेला हा सर्वात मोठी अंमली पदार्थ साठा असल्याचे सांगितले जात आहे.

मादक पदार्थ बनविण्याचे ज्ञान - अमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेंतर्गत अमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटअमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे, पुरवठा, साठा करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत होते. या शोधमोहिमेदरम्यान, गोवंडी-शिवाजीनगर येथून संशयित आरोपीला एमडी मॅफेड्रॉनसह ताब्यात घेण्यात आले होते. या व अन्य चार आरोपींच्या चौकशीत पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली होती. या आरोपीने रसायन शास्त्रात ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे शिक्षण घेतलेले आहे. वेगवेगळी केमिकल एकत्र करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून एमडी (मॅफेड्रॉन) हा मादक पदार्थ बनविण्याचे ज्ञान त्याने आत्मसात केले होते.

पदार्थाची किंमत 1403 कोटी 48 लाख रुपये - मागणीप्रमाणे तो हा पदार्थ गिऱ्हाईकांना विकत असतो, अशी माहिती प्राथमिक तपासात या युनिटला मिळाली होती. स्वत:ची ओळख लपवण्यासाठी हा आरोपी वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाई पोलिसांनी त्याच्याकडून 701 किलो 740 ग्रॅम वजनाचा एमडी-मॅफेड्रॉन सदृश अमलीपदार्थ जप्त केला आहे. या पदार्थाची किंमत 1403 कोटी 48 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा - Cabinet Expansion Of Shinde Govt: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; वाचा संभाव्य मंत्रिमंडळाची यादी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.