ETV Bharat / state

Water logging in Vasai Virar : वसई विरारच्या परिस्थितीला जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार - खासदार राजेंद्र गावित - पालघरचे खासदार राजेंद्र गावित

वसई-विरारमध्ये गेल्या तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांनी वसई-विरारमधील पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. या बैठकीनंतर खासदार गावित यांनी विरार आणि नालासोपाऱ्याचा पाण्यात उतरून दौरा केला. विरार पश्चिम परिसरातून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्याशी आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी संवाद साधला.

खासदार राजेंद्र गावित
खासदार राजेंद्र गावित
author img

By

Published : Jul 22, 2023, 8:12 AM IST

Updated : Jul 22, 2023, 12:18 PM IST

खासदार राजेंद्र गावितांनी घेतला पूरस्थितीचा आढावा

पालघर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांच्या रस्त्यांवर पाणी साचत असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी विविध उपाय योजना केल्याचे सांगण्यात येतात, परंतु पाऊस आल्यानंतर शहरातील रस्त्यांवर पाणी तुंबल्याचे चित्र समोर येते. वसई-विरारमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी तुंबले आहे. या घटनांमुळे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित प्रचंड संतापले. पूरस्थिती आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सज्जड दम देत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला.

आढावा बैठक : वसई-विरारमध्ये गेल्या तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात हाहाकार उडाला असून शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीचा आढावा खासदार राजेंद्र गावित यांनी घेतला. वसई-विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा सर्वात मोठा फटका मुंबई अहमदाबाद महामार्गाला बसला आहे. महामार्गांवर अनेक भागात पावसाचे पाणी साचल्याने दोन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र यावर प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी पालिका मुख्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी वसई-विरार पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, बविआचे माजी महापौर नारायण मानकर, उमेश नाईक, रुपेश जाधव,आगरी सेनेचे कैलास पाटील,जयेश पाटील, अजित खांबे,मयुरेश वाघ,राजन नाईक ,महेंद्र पाटील,मनोज पाटील यांच्यासह पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सुहास बावचे, महावितरणचे संजय खंदारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

गुन्हे दाखल करण्याचा इशारा : या बैठकीत महामार्ग प्रशासन, पोलीस प्रशासन, पालिका, महसूल, वनविभाग, महावितरण व रेल्वे प्रशासनाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंबई अहमदाबाद महामार्ग दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने त्यावर दरवर्षी उपाययोजनांचा पाढा वाचला जातो. मात्र महामार्ग प्रशासन यावरील उपाययोजना कागदावरच ठेवत असल्याने खासदार राजेंद्र गावित आणि पालिका आयुक्त अनिल पवार यांनी महामार्ग प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. महामार्गात पाण्याचा निचरा होण्यास अडथळे ठरणाऱ्या हॉटेल्स आणि धाब्यांवर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. महामार्गाच्या पाणी समस्येवर उपाययोजना न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा गावित यांनी यावेळी दिला.

हेही वाचा -

  1. Maharashtra Monsoon Rain : आज राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; पुणे, वसई विरारला रेड अलर्ट तर मुंबईला ऑरेंज अलर्ट
  2. Kavanai Fort In Nashik: नाशिकच्या कावनई किल्ल्याहून दरड कोसळली; बघा व्हिडीओ...
  3. Heavy Rain In Vasai Virar : वसई, विरार पुन्हा एकदा जलमय; 50 कुटुंबांचे स्थलांतर

Last Updated : Jul 22, 2023, 12:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.