पालघर (वाडा) - पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी भागात आज (25 जुलै) भूकंपाचे धक्के बसले होते. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या ठिकाणाचा पहाणी दौरा केला. यावेळी जिल्हाधिकारी कैलास शिंदे, आमदार पास्कल धनारे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे, आदिवासी आघाडीचे हरिश्चंद्र भोये आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी डहाणूतील नागझरी (वासावलपाडा) येथील भूकंपाच्या धक्क्याने घर कोसळून मृत झालेल्या रिष्या मेघवाले (वय 55) यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली. त्यानंतर यावर मदतीचे व उपायोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.