ETV Bharat / state

हुतात्मा मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी 'कनिका' लवकरच सैन्यात दाखल होणार

कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्याला 1 वर्षही पूर्ण झालेले नसताना कनिका राणे या सैन्यअधिकारी पदासाठी दिलेल्या परीक्षेत पास झाल्या आहेत.

कनिका राणे
author img

By

Published : Jul 31, 2019, 8:19 PM IST

Updated : Jul 31, 2019, 10:26 PM IST

पालघर/वसई - दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना वीरमरण आलेल्या मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी कनिका राणे सैन्यात दाखल होणार आहेत. त्यासाठी त्यांनी पूर्व परीक्षा पास केली आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले होते. त्यावेळी आपल्या पतीच्या हौतात्म्यानंतर आपणही आपले जीवन देशासाठी देण्याचा निर्णय कनिका राणे यांनी घेतला होता.

ज्योती राणे, कौस्तुभ राणेंची आई

कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्याला 1 वर्षही पूर्ण झालेले नसताना कनिका राणे या सैन्यअधिकारी पदासाठी दिलेल्या परीक्षेत पास झाल्या आहेत. त्या आता ऑक्टोबर महिन्यात सैन्य प्रशिक्षणासाठी चेन्नईला जाणार आहेत. मिरा रोडच्या शीतल नगर परिसरात राहणाऱ्या मेजर कौस्तुभ राणेंना 6 ऑगस्ट 2018 ला वीरमरण आले होते.

कौस्तुभ राणे यांनी आपल्या 6 वर्षांच्या नोकरीमध्ये प्रत्येक क्षण देशासाठी जगण्याची शपथ घेतली होती. राणे यांनी आपली ही शपथ शेवटपर्यंत पाळली. राणे हे आपल्या घरातील एकुलते एक असल्यामुळे संपूर्ण कुटूंबीयांची जबाबदारी त्यांच्यावरच होती. मात्र, आता त्यांच्यानंतर पूर्ण घराचा भार उचलण्याचा निर्धार त्यांची पत्नी कनिका राणे यांनी केला आहे. सैन्याच्या अधिकारी पदासाठी दिलेल्या परीक्षेत त्यांची निवड झाली असून त्यांनी साहसी कार्ये पूर्ण केली आहेत.

मेजर कौस्तुभ राणेंची पत्नी कनिका राणे यांनी ज्या प्रकारे कठीण परिस्थितीमध्ये सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि परीक्षा पास केली. यावर सासरे प्रकाश राणे, सासू ज्योती राणे यांनी मुलाप्रमाणेच सुनेचाही सर्वांना अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Intro:शहीद मेजर कौतुभ राणेंच्या पत्नी कनिका होणार सैन्यात दाखल.Body:शहीद मेजर कौतुभ राणेंच्या पत्नी कनिका होणार सैन्यात दाखल.
विपुल पाटील
पालघर / वसई (दिनांक : ३१.७.२०१९ )... शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी कनिका राणे सैन्यात भरती होण्यासाठी पूर्व परीक्षा पास केली.असून अशा सुनेवर सासू आणि सासरे यांना कौस्तुभ प्रमाणे आता अभिमान वाटू लागला आहे.
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले होते.आपल्या पतीच्या होतात्म्यानंतर आपण देखील आपले जीवन सैन्याला देण्याचा कनिका राणे यांनी निर्णय घेतला होता.अखेर शहीद कौस्तुभ राणे यांच्या होतात्म्याला १ वर्ष पूर्ण झालेल नसताना कनिका राने यांनी सैन्यअधिकारी पदासाठी दिलेली परीक्षा पास करून ऑक्टोबर महिन्यात त्या चेन्नईला सैन्य प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. मिरा रोडच्या शीतल नगर परिसरात राहणारे मेजर कौस्तुभ राणे ६ ऑगस्ट २०१८ ला शहीद झाले होते. आपल्या सहा वर्षांच्या नोकरीमध्ये प्रत्येक क्षण देशासाठी जगण्याची कौस्तुभ यांनी शपथ घेतली होती. राणे यांनी आपली ही शपथ शेवटपर्यंत पाळली . राणे हे आपल्या घरातील एकुलते एक असल्या कारणांमुळे कुटूंबियांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या वरच होती. परंतु आपले पती कौस्तुभ राणे शहीद झाल्यानंतर पूर्ण घराचा भार उचलण्याचा निर्धार त्यांच्या पत्नी कनिका राणे यांनी केला होता.. सैन्याच्या अधिकारी पदासाठी दिलेल्या परीक्षेत त्यांची निवड झाली असून ती साहसीक कार्य पूर्ण केली.
शहीद मेजर कौस्तुभ राणेची पत्नी कनिका कौस्तुभ राणे यांनी ज्या प्रकारे कठीण परिस्थितीत मध्ये सैन्यात जाण्याचं निर्णय घेतला आणि परीक्षा पास केली. यांवर सासरा प्रकाश राणे, सासू ज्योती प्रकाश राणेला मुलगा कौस्तुभ राणे सारखेच सून आहे. कुटुंबियांचा सर्वाना अभिमान वाटावा असा आदर्श आहे.

BYTE ... ज्योती राणे ..(कौस्तुभ राणेची आई )Conclusion:
Last Updated : Jul 31, 2019, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.