पालघर - महाराष्ट्रात एका क्षुल्लक मुद्द्यावरून आईची हत्या ( Man held for killing mother in Palghar ) केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी एका 39 वर्षीय व्यक्तीला अटक केली.
आरोपी रुपेश गंगाणी हा दारू पिणारा होता आणि तो ७० वर्षांच्या आईशी शुल्लक कारणावरून वारंवार भांडत असे, असे तारापूर पोलीसांनी सांगितले.तारापूर येथील त्यांच्या घरी सोमवारी संध्याकाळी भांडणाच्या वेळेस आरोपीने आईवर लाकडाने हल्ला केला. आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचेही सांगितले.
आरोपीवर दाखल करण्यात आला गुन्हा
आरोपीच्या शेजाऱ्यांनी ही माहिती पोलीसांना दिली. पोलीसांनी आरोपीला पकडले आणि आरोपीच्या आईता मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला.आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने तरुणाचे अपहरण; जालना येथून दोघांना अटक