पालघर - जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपकडून हेमंत सावरा यांनी तर महाआघाडीकडून सुनील भुसारा यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबतच काही भाजपमधील बंडखोरांनीही अपक्ष अर्ज भरले आहेत. दोघा पक्षाच्या उमेदवारांनी यावेळी शक्तिप्रदर्शन केले.
हेही वाचा - दिग्गजांच्या तिकीट कपातीने मुख्यमंत्र्यांचे आसन बळकट
महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या योजना या भागात सुरू झाल्या आहेत. येथील कुपोषणाबाबत उपाययोजना आणि रोजगार उपलब्धतेसाठी प्रयत्न केले आहेत आणि यापुढे केले जातील. तर नाराज कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - गंगाखेड मतदारसंघासाठी रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातूनच भरला उमेदवारी अर्ज
हेमंत सावरा यांनी सकाळी 11.30 च्या दरम्यान अर्ज भरला. त्याअगोदर महाआघाडीचे उमेदवार सुनिल भुसारा यांनी अर्ज भरला आणि लगेचच भाजप मधील उमेदवारीसाठी इच्छुक असलेले हरिश्चंद्र भोये, सुरेखाताई थेतले, मधुकर खुताडे या बंडखोरांनी एकत्र येत शक्तिप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर नाराज कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हा विस्तारक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे, अर्चना वाणी, जिल्हा संघटन सरचिटणीस नंदकुमार पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शहा, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, आरपीआय जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव आदी उपस्थित होते.