ETV Bharat / state

नायगाव पूर्वेतील सनटेक इमारती जवळील भाग खचला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - पालघर जिल्हा लेटेस्ट न्यूज

नायगाव पूर्वेतील टीवरी रस्त्यालगत नव्याने विकसीत झालेल्या सनटेक इमारती जवळील भाग खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इमारती जवळील भाग खचला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

author img

By

Published : Apr 4, 2021, 7:15 PM IST

वसई - नायगाव पूर्वेतील टीवरी रस्त्यालगत नव्याने विकसीत झालेल्या सनटेक इमारती जवळील भाग खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नायगाव पूर्वेतील टीवरी रस्त्यालगत सनटेक परिसर आहे. या भागात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. त्यातील काही इमारती पूर्ण झाल्या आहेत. त्यामधील काही सदनिकांमध्ये नागरिक राहण्यास आले आहेत. परंतु शनिवारी मध्यरात्री २२ मजली इमारतीच्या जवळील जमिनीचा काही भाग खचल्याची घटना घडली आहे. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच इमारतीमध्ये राहणारे रहिवासी तातडीने खाली उतरले. याठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते.

इमारती जवळील भाग खचला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

यापूर्वी देखील खचला होता जमिनीचा भाग

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जवळपास ३० ते ४० फूट इतका जमिनीचा भाग खचला आहे. विकासकांच्या निष्काळजीपणामुळे असा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जमीन खचण्याच्या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वर्षभरापूर्वी याच इमारतीच्या मागील बाजूस जमिनीचा भाग खचल्याची घटना घडली होती. त्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. पालिकेच्या नगरविकास विभागाकडून सदर इमारतींची पाहणी करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.