ETV Bharat / state

पालघर: जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात गणरायाचे आगमन - हरतालिका

'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात आज घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, भाविकांनी शाळुच्या गणपती मुर्तीला पंसती दिल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात गणरायाचे आगमन
author img

By

Published : Sep 2, 2019, 9:53 PM IST

पालघर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचे राज्यसह पालघर जिल्ह्यातही मंगलमय वातावरणात आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीला लागले होते.

जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात गणरायाचे आगमन
रविवारी हरतालिकेनिमित्त अनेक महिलांनी घरोघरी पूजा केली. त्यानंतर आज सोमवारी जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, यावर्षी अनेक भाविकांनी शाडूच्या मूर्तीला पसंती दिली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. थर्माकोलला बंदी असल्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर प्लायवूड, पुठ्ठा, वेलवेट, एलईडी, लेस, अशा आकर्षक सजावटीचे सिंहासन, बैठका, मंदिर-मखरे बाजारात दिसून येत आहेत. या आकर्षक व सुबक मंदिरांची भाविकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

Intro:जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात गणरायाचे आगमनBody:जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात गणरायाचे आगमन

नमित पाटील,
पालघर, दि. 2/9/2019

     महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचे  राज्यसह पालघर जिल्ह्यातही मंगलमय वातावरणात आगमन झाले असून  ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले होते. आजपासून या आनंद सोहळ्याला सुरुवात झाली असून आता पुढील दहा दिवस राज्याच्या कानाकोपऱयात ‘मोरया…मोरया’चा जयघोष असेल. 

      रविवारी हरितालिकेनिमित्त अनेक महिलांनी घरोघरी पूजा केली. त्यानंतर आज जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रींचे त्या अनुषंगाने अनेक भाविकांनी यंदा शाडूच्या मूर्तीला पसंती दिल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. थर्माकोलला बंदी असल्यामुळे यंदा मोठय़ा प्रमाणावर प्लायवूड, पुठ्ठा, वेलवेट, एलईडी, लेस, अशा आकर्षक सजावटीचे सिंहासन, बैठका, मंदिर-मखरे बाजारात दिसून येत आहेत. या आकर्षक व सुबक मंदिरांची भाविकांनी मोठय़ा प्रमाणात खरेदी केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.