पालघर - जिल्ह्यातील वाडा नगर पंचायतीने शहरातील घनकचरा उचलण्यासाठी स्वच्छता अभियान अंतर्गत 30 लाखाच्या नवीन गाड्या खरेदी केल्या आहेत. मात्र, या गाड्या अजून न वापरता तशाच पडून आहेत. त्या ऐवजी जुन्याच गाड्या नगरपंचायतीचे कर्मचारी चालवत आहेत. नवीन गाड्यांचा वापर करावा अन्यथा नवीन गाड्या स्वतः नगरसेवक चालवेल असा इशारा वाडा नगर पंचायत नगरसेवक रामचंद्र भोईर यांनी इशारा नगरपंचायतीला दिला आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा नगर पंचायत सुरुवातीपासून महाविकास आघाडी साकारली आहे. या नगरपंचायतीत भाजप हा विरोधी बाकावर आहे.17 नगरसेवक असलेल्या नगरपंचायतीच्या कारभारावर भाजपकडून ताशेरे ओढत असते. अशातच या नगरपंचायतीने घेतलेल्या गाड्या हा सध्या कळीचा मुद्दा बनत चालला आहे.
विना वापर घंटागाड्या धूळखात -
गतवर्षी वाडा नगरपंचायतीने घंटागाड्या खरेदी केल्या. मात्र, अजून त्या पडून आहेत. त्याचा वापर केला जात नाही असा आरोप वाडा नगरपंचायतीचे नगरसेवक रामचंद्र भोईर यांनी नगरपंचायतीला सादर केलेल्या निवेदनात केला आहे. या गाड्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या पाण्याच्या टाकी जवळ दिसून येत आहेत.
स्वतः नगरसेवक गाड्या चालविण्याचा इशारा -
वाडा नगरपंचायतने स्वच्छ अभियानात 30 लाख रुपयेने खरेदी केलेल्या घंटागाड्या या विना वापर धूळ खात पडून आहेत. पर्यायाने नगरपंचायतीचे कर्मचारी जुन्याच गाड्यांचा वापर करत आहेत. नवीन गाड्या वापर करावा नाहीतर स्वतः या गाड्या मी चालवेन असा इशारा रामचंद्र भोईर यांनी इशारा दिला आहे.