पालघर - येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई नजिक मालजीपाडा येथे आज (बुधवारी) संध्याकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास एका होंडा सिटी कारने अचानक पेट घेतला. यामुळे महामार्गावर घबराट उडाली होती. यात होंडा सिटी कार जळून खाक झाली.
हेही वाचा- आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मद्यपींनी दिला त्रास; सभागृहात केली तक्रार
कांदिवली येथील निलेश पटीयाल हे आपल्या होंडा सिटी कारने जात होते. दरम्यान, रात्री 8:30 च्या सुमारास वसई मालजीपाडा येथे त्यांच्या गाडीतून धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधानाने रस्त्याच्या कडेला कार थांबवली, ते बाहेर पडले. मात्र, काही कळण्याच्या आत कारने अचानक पेट घेतला. यावेळी महामार्गावर एकच खळबळ उडाली. काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला याबाबत कळविण्यात आले. मात्र, या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.