ETV Bharat / state

पालघर : वाडा तालुक्यातील शेतकरी पुत्र यूपीएससीमध्ये देशात ३९ वा - IPS

जिल्ह्यातील हेमंता केशव पाटील हा ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा देशात ३९ वा तर राज्यात पाचवा आला आहे. हेमंताने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत यश मिळवले.

हेमंता केशव पाटील
author img

By

Published : Apr 7, 2019, 12:43 PM IST

पालघर - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी २०१८ च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील हेमंता केशव पाटील हा ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा देशात ३९ वा तर राज्यात पाचवा आला आहे.

हेमंता हा वाडा तालुक्यातील शिल्लोत्तर या गावातील विद्यार्थी असून त्याने आपले प्राथमिक शिक्षण तलासरीमधील ठक्कर बाप्पा आश्रमशाळेत पूर्ण केले. पहिलीपासूनच तो कायम अव्वल क्रमांकावर असायचा. हेमंताला शिक्षण, वक्तृत्व आणि खेळाचीही आवड आहे. हेमंताने बारावीपर्यंतचे शिक्षण वाडा तालुक्यातील चंदावरकर महाविद्यालयामध्ये पूर्ण केले असून विशेष म्हणजे तेव्हाही तो तालुक्यात पहिला आला होता. त्यानंतर हेमंताने रायगड जिल्ह्यातील लोणेरमध्ये केमिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. तेथेही तो गोल्ड मेडलिस्ट ठरला.

शिक्षणानंतर गुजरातमधील अंकलेश्वरमध्ये हेमंताला नोकरी मिळाली. मात्र, त्यामुळे लोकसेवा परीक्षांचा अभ्यास करता येणार नाही. म्हणून आई-वडील आणि मोठा भाऊ विकास यांच्या सल्ल्याने त्याने नोकरीला रामराम ठोकला. हेमंताचे वडील केशव पाटील हे शेतकरी कुटुंबातील आहेत.

हेमंताने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा देण्याचा विचार केला. गेल्या वर्षी हेमंता देशात ६९६ व्या रँकवर आला आणि त्याला आयआरएफ पदवी मिळाली. मात्र, तेथेही न थांबता हेमंताने पुन्हा कठोर मेहनत करुन परीक्षा दिली. आता तो देशात ३९ वा, तर राज्यात पाचवा यशस्वी विद्यार्थी ठरला आहे.

Intro:केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा अर्थात यूपीएससी निकाल: पालघर जिल्ह्यातील, वाडा तालुक्यातील हेमंता केशव पाटील देशात 39 वा तर राज्यात 5 वाBody:केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा अर्थात यूपीएससी निकाल: पालघर जिल्ह्यातील, वाडा तालुक्यातील हेमंता केशव पाटील देशात 39 वा तर राज्यात 5 वा

नमित पाटील,
पालघर, दि.6/4/2019

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018 परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील हेमंता केशव पाटील हा ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा देशात 39 वा तर राज्यात पाचवा आला आहे.

हेमंता हा वाडा तालुक्यातील शिल्लोत्तर या गावातील विद्यार्थी असून हेमंताने आपलं प्राथमिक शिक्षण तलासरीमधील ठक्कर बाप्पा आश्रमशाळेत पूर्ण केलेे. पहिलीपासूनच तो कायम अव्वल क्रमांकावर असायचा, हेमंताला शिक्षण, वक्तृत्व आणि खेळाचीही आवड आहे. हेमंताने बारावीपर्यंतचं शिक्षण वाडा तालुक्यातील चंदावरकर कॉलेजमध्ये पूर्ण केले असून विशेष म्हणजे तेव्हाही तो तालुक्यात पहिला आला होता. त्यानंतर हेमंताने रायगड जिल्ह्यातील लोणेरमध्ये केमिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला, तेथेही तो गोल्ड मेडलिस्ट ठरला.

शिक्षणानंतर गुजरातमधील अंकलेश्वरमध्ये हेमंताला नोकरी मिळाली, मात्र त्यामुळे लोकसेवा परीक्षांचा अभ्यास करता येणार नाही, म्हणून आई-वडील आणि मोठा भाऊ विकास यांच्या सल्ल्याने त्याने नोकरीला रामराम ठोकला. हेमंताचे वडील केशव पाटील हे साध्या शेतकरी कुटुंबातील आहेत.

हेमंताने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा देण्याचा विचार केला. गेल्या वर्षी हेमंता देशात 696 व्या रँकवर आला आणि त्याला आयआरएफ पदवी मिळाली. मात्र तिथेही न थांबता हेमंताने पुन्हा कठोर मेहनत करुन परीक्षा दिली. आता तो देशात 39 वा, तर राज्यात पाचवा यशस्वी विद्यार्थी ठरला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.