विरार /अर्नाळा - अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्री वादळाचा फटका पालघर किनारपट्टी भागालाही बसत आहे. रविवारी रात्रीपासून वसई-विरारसह संपूर्ण जिह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. समुद्र किनारपट्टी भागात प्रती ६० किमी वेगाने वारे वाहत असून या वादळीवाऱ्यामुळे अनेक झाडांची पडझड झाली आहे.
अर्नाळा समुद्रकिनारी लाटांचा मारा; पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू
अर्नाळा समुद्र किनारी काल रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात वेगवान वारे वाहायला सुरुवात झाली आहे. तर पालघर किनारपट्टीवर याचा फटका बसायला सुरुवात झाली आहे.
पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू