ETV Bharat / state

पहिल्याच पावसात वसई-विरार जलमय, पालिकेचा नालेसफाई केल्याचा दावा फोल - पालघर बातमी

वसई-विरारमध्ये बुधवारी (दि. 9 जून) सकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसाने शहरी भागातील सखल भागात पाणी साचल्याने वसई-विरार महापालिकेचे नालेसफाई केल्याचे सारेच दावे फोल ठरतानाचे दृश्य विविध परिसरात दिसून येत होते. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.

पाऊस
छायाचित्र
author img

By

Published : Jun 9, 2021, 6:32 PM IST

पालघर (विरार) - वसई-विरारमध्ये बुधवारी (दि. 9 जून) सकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसाने शहरी भागातील सखल भागात पाणी साचल्याने वसई-विरार महापालिकेचे नालेसफाई केल्याचे सारेच दावे फोल ठरतानाचे दृश्य विविध परिसरात दिसून येत होते. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.

आढावा घेताना प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षे वसई-विरार परिसरात पडलेल्या पावसाने सुमारे आठवडाभर जनजीवन विस्कळीत केले होते. या घडलेल्या घटनांचा धडा घेत यंदाच्या वर्षी महापालिकेने पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेत योग्य उपाययोजना केल्याचा दावाही केला. कोरोनामुळे नालेसफाई कामात थोडा वेळ लागला असला तरी पालिकेकडून नालेसफाई केल्याचे सांगीतले जात होते. शहरातील भूमीगत गटारे, नाले व शहराबाहेर खाड्यांना मिळणारे मोठे नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी विशेष यंत्रणा राबविण्यात आली होती. मात्र, पहिल्याच पावसात महापालिकेची अद्यावत यंत्रणा व दावे फोल ठरल्याचे नागरिकांना दिसत आहे. विरार, नालासोपारा व वसईतील बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यांमूळे नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागला.

वसईतील जुलै, 2018 मध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. चार दिवस वसई पुराच्या पाण्याखाली होती. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी शहरातील गटारे, मोठे नाले व शहराबाहेरील खाड्यांचे पात्र साफसफाई करण्यास पालिकेने सुरुवात केली होती. वसई-विरारमध्ये मंगळवारी (दि. 8 जून) रात्रीपासून पावसाची रिपरिप चालू होती. बुधवारी सकाळपासून पावसाने जोर धरला. त्यानंतर पडलेल्या धुवाधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले. या पहिल्याच पावसाने वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्या असून सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे वसई-विरार महापालिकेचे नालेसफाई केल्याचे सारेच दावे फोल ठरतानाचे दृश्य विविध परिसरात दिसून येत आहे.

नालासोपाराच्या पूर्वेकडील सेन्ट्रल पार्क, विजय नगर, आचोळे, अग्रवाल नगर, तुळींज रोड, संतोष भवन, धानीव बाग, पश्चिममेकडील निलेगाव, पाटणकर पार्क आदी परिसरात पाणी साठले आहे. वसई पूर्व येथील सातिवली, वालीव, भोयदापाडा, गोलानी नाका, सनसिटी, एव्हरशाईन येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच विरारमधील विवा कॉलेज परिसर, चंदनसार आदी भागात पाणी साठले होते.

हेही वाचा - Palghar Rain update : पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.