ETV Bharat / state

वसई-विरार, नालासोपाऱ्यामधील रस्त्यांना नदीचे स्वरूप

काल रात्रीपासून पालघर जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून वसई-विरार व पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर साचले पाणी
author img

By

Published : Sep 15, 2019, 10:08 AM IST

Updated : Sep 15, 2019, 10:13 AM IST

पालघर- वसई-विरार, नालासोपाऱ्यामध्ये पावसाने जोर धरला आहे. शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे वसई-विरारमधील सर्व रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे.

मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर साचले पाणी

रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोठणपूर येथील नगरपरिषद आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांच्या चाळीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसानही झाले आहे. मुसळधार पावसामुळे पालघर-बोईसर रोड, पालघर- माहीम रोड, पालघर- मनोर रोड, पालघर- टेंभोडे रोड, पालघर- माहीम रोड या रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

विरारच्या सखल भागात असलेल्या विवा कॉलेज, बोलिज रोड तर नालासोपाऱयात टाकीरोड, तुळींज रोड, सेन्ट्रल पार्क, गाला नगर, वसंत नगरी, नालासोपारा स्टेशन परिसर, अचोळे रोड येथेही पाणी साचले आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला तर पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Intro:वसई विरार नालासोपारा रस्त्यांना नदीचे स्वरूप.
Body:वसई विरार नालासोपारा रस्त्यांना नदीचे स्वरूप.

पालघर /वसई : वसई विरार नालासोपारा पावसानेही जोर धरला. काल रात्री पासून पावसाची कोसळधार सुरु आहे. मुसळधार पावसामुळे वसई विरार चे सर्व रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे आहेत. विरारच्या सखल भागात असलेल्या विवा कॉलेज बोलिज रोड तर नालासोपारा मध्ये ,टाकीरोड, तुळींज रोड, सेन्ट्रल पार्क,गाला नगर ,वसंत नगरी नालासोपारा स्टेशन परिसर,अचोळे रोड पाणी साचले आहे हा पाऊस असाच सुरू राहिला तर पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे
Conclusion:
Last Updated : Sep 15, 2019, 10:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.