पालघर - जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळ पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामध्ये पालघर, डहाणू, तलासरी परिसरात रात्रभर पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे सूर्य प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ही दोन्ही धरणे 100 टक्के भरली आहेत.
हेही वाचा - पहिल्या जेतेपदावेळी 'तिचा' जन्मही झाला नव्हता, तिनं आज सेरेनाला चारली धूळ!
धामणी धरणाचे 1, 3 आणि 5 हे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. धामणी धरणातून 3400 क्यूसेक तर कवडास धरणातून 7837 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत होत आहे. यामुळे सूर्या नदी ओसांडून वाहत आहे. तर, धोक्याचे कारण नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, पावसाचा जोर पुन्हा वाढला तर पालघर मधील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - पुढच्या वर्षी लवकर या..! मुंबईत ४४ हजार गौरी-गणपतीचे विसर्जन