ETV Bharat / state

Firing in Boisar : बोईसरमध्ये भरदिवसा गोळीबारात तरुणीचा मृत्यू, दुसऱ्या गाडीला धडकून हल्लेखोर तरुणही ठार.. घटना सीसीटीव्हीत कैद - daytime firing in Boisar Palghar

बोईसर-पालघर रोडवरील टीमा हॉस्पीटल रेल्वे फ्लाई ओव्हरजवळ एका माथेफिरू तरुणाने केलेल्या गोळीबारात (Firing in Boisar) २१ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू (Girl killed in daytime firing) झाला. सदर घटना सिसिटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

Girl killed in daytime firing in Boisar Palghar
गोळीबारात तरुणीचा मृत्यू
author img

By

Published : Sep 29, 2022, 9:52 AM IST

Updated : Sep 30, 2022, 4:13 PM IST

पालघर : बोईसर-पालघर रोडवरील टीमा हॉस्पीटल रेल्वे फ्लाई ओव्हरजवळ एका माथेफिरू तरुणाने केलेल्या गोळीबारात (Firing in Boisar) २१ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू (Girl killed in daytime firing) झाला. दरम्यान गोळीबार करून पळून जात असलेला तरुण प्रथम विराज कंपनीच्या गाडीला व नंतर संरक्षणदलाच्या आर्मी ट्रकला धडकून गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

बोईसरमध्ये भरदिवसा गोळीबारात तरुणीचा मृत्यू

घटना प्रेम प्रकरणातून घडल्याचा अंदाज - कृष्णा यादव, असं या मयत तरुणाचे नाव आहे. गोळीबाराची ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून पुढील तपास बोईसर एमआयडीसी पोलीस करत आहेत. बोईसरमधील टीमा रुग्णालयाच्या प्रवेशदवाराजवळ व रेल्वे फ्लाई ओव्हरच्या खाली दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास कृष्णा यादव (रा. कोलवडे) या तरुणाने स्नेहा दिनेशकुमार महतो (रा. सरावली) वय २१ वर्षे या तरुणीची स्वतःजवळील पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडत हत्या केली (firing in Boisar Palghar) आहे.

उपचारादरम्यान आरोपीचाही मृत्यू - गोळी मारून पळून जात असताना फ्लाई ओव्हरजवळील डी डेकोर कंपनीजवळ प्रथम विराज कंपनीच्या ट्रकला व नंतर मिलीटरीच्या गाडीला धडकून आरोपी तरुण हा जखमी झाला होता. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे बोईसर पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेची खबर मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेत टीमा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरुणाकडील पिस्तुल हस्तगत करण्यात आले असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले (Girl killed in Boisar) आहे. सदर घटना सिसिटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

Last Updated : Sep 30, 2022, 4:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.