पालघर/ वाडा - जव्हार तालुक्यातील खरवंद फाटा येथील काजूची वाडीत तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही आत्महत्या सकाळच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी जव्हार पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत.
निलम विलास भोरे (वय -१९) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. जव्हार शहराच्या ५ ते ७ किलोमीटर अंतरावर सकाळी ११ च्या सुमारास खरवंद फाटा येथील काजूची वाडीत परिसरातील सावरपाडा गावातील तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.
निलम भोर हिचे जव्हार येथील पतंगशहा कुटीर रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार डी.टी.ढोणमारे करत आहेत.