ETV Bharat / state

Ghangli Musician Sonu Mhase : जव्हारमधील सोनू म्हसे यांचा जी 20 परिषदेत घांगळी वादक म्हणून सहभाग, वाचा घांगळी आहे तरी काय... - जी 20 शिखर परिषद

Ghangli Musician Sonu Mhase : जी 20 शिखर परिषदेत जागतिक नेत्यांच्या संगीतमय स्वागतासाठी 78 वादकांचा समूह सज्ज झालाय. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील सोनू म्हसे यांना सहभागी होण्याचा मान मिळालाय. या समारंभात भारतभरातील 34 हिंदुस्थानी वाद्ये, 18 कर्नाटकी वाद्ये आणि 26 लोकवाद्ये यांचा समावेश आहे. 78 कलाकारांमध्ये 11 मुले, 13 महिला, सहा दिव्यांग कलाकार, 26 तरुण पुरुष आणि 22 व्यावसायिकांचा समावेश आहे.

G20 Conference
जव्हारमधील घांगळी वादक सोनू म्हसे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 4:05 PM IST

जव्हारमधील घांगळी वादक सोनू म्हसे

पालघर Ghangli Musician Sonu Mhase : जव्हारमधील सोनू म्हसे यांनी जी 20 परिषदेत घांगळी वादक म्हणून सहभाग नोंदवलाय. ते पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील कडाचीमेट साकुर या अतिशय दुर्गम आदिवासी भागातील रहिवासी आहेत. आदिवासी समाजातील एकूण ४७ अनुसूचित जमातीपैकी ते वारली या पोटजमातीचे आहेत. आदिवासीच्या रुढी, परंपरा, संस्कृती व चालीरीती जोपासण्यासाठी घांगळी वाद्य वाजवण्याची व त्यावर कणसरीची कथा गायन करण्याची आवड त्यांना लहानपणी आजोबांकडून निर्माण झालीय.

घांगळी वादन आदिवासी कला : वयाच्या 16 व्या वर्षापासून घांगळी वादन आदिवासी कला अवगत करून त्याची जोपासना त्यांनी केलीय. तसंच आपल्या या कलेच्या माध्यमातून आदिवासींची संस्कृती आणि निसर्गाची जोपासना करून त्यांची अस्मिता कायम टिकून राहावी असा त्यांचा प्रयत्न आहे. आदिवासींच्या रुढी, परंपरा, संस्कृती व चालीरीती यांचा प्रसार व प्रचार ते आजपर्यंत करत आहेत. (ghangli musician Sonu Mhase in G20 conference) त्यांनी त्यांच्या घांगळी वाद्य कलेचा विस्तार गावातून तालुक्याच्या पंचकोशीत, गावागावात त्याबरोबर महाराष्ट्रातील विविध शहरांव्यतिरिक्त त्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, आसाम, गोवा आणि कर्नाटक या राज्यांना भेटी देऊन आदिवासी लोककलांची प्रदर्शने भरवली आहेत.

घांगळी वाद्यावर गायन : उत्सवाची मांडणी व पूजा तसंच घांगळी वाद्यावर गायन करुन दोन दिवसात कणसरी देवीच्या उत्सवाची सांगता करतात. हा उत्सव मार्गशिर्ष महिन्यात शेतकऱ्यांच्या घरी व खळ्यावर नागली मळून करतात. सुमारे दोनशे उत्सव पार पाडण्याचा अनुभव त्यांना आहे. तसंच चाळ सरावर मृत्यूची कथा रात्रभर सांगून पारंपरिक उत्तर कार्याचा कार्यक्रमही ते पार पाडतात. (G20 conference update)

'असं' आहे घांगळी वाद्य : घांगळी हे वारली समाजाचं पारंपरिक वाद्य आहे. हे वाद्य काहीसं विण्यासारखं दिसतं. वारली समाजात दिवाळी, शिमगा यांसारखे सण, लग्नसमारंभ तसंच प्रार्थना करताना हे वाद्य वापरलं जातं. त्यावेळी हे घांगळी वाद्य प्रामुख्याने वाजविलं जातं. हे वाद्य वाजविणार्‍यांना घांगळी भगत असं म्हटलं जातं. आपल्याला हे वाद्य भू-मातेनं दिलंय, अशी वारली लोकांची श्रध्दा आहे. घांगळी वाद्य बनविण्यासाठी दोन सुकलेल्या भोपळ्यांचा वापर केला जातो. दोन्ही भोपळ्यांना जोडण्यासाठी उत्तम प्रतीच्या बांबूंचा उपयोग करतात. मेणानं ते जोडलं जातं. त्यातून नाद निर्माण करण्यासाठी या बांबूवर तारा बसविलेल्या असतात. हे वाद्य वाजविण्यासाठी मोरपिसं, काचेच्या रंगीत बांगड्या, आरसा किंवा बोटांचा वापर केला जातो. हा तंतुवाद्याचा आद्य प्रकार आहे.

वाद्य शिकण्यासाठी कडक प्रशिक्षणाची गरज : हे वाद्य वाजविण्यासाठी खास प्रशिक्षण घ्यावं लागतं. अनुभवी भगत ही विद्या तरुण मुलांना शिकवितात. पावसाळ्याच्या प्रारंभी काळ ते दिवाळी, असा या शिक्षणाचा कालावधी आहे. या काळात शिकाऊंना काही व्रते कडकपणे पाळावी लागतात. जो पाळत नाही, त्यास शिक्षा केली जाते. हे वाद्य शिकण्यासाठी अतिशय कडक नियम असतात, असं सांगितलं जातं. सध्या हे वाद्य खूपच दुर्मीळ झालं आहे. ते केवळ खेड्यातील वारली समाजातील सण, समारंभातच दिसतं.

हेही वाचा :

  1. Daksh Boopathi interview: १२ वर्षांचा दक्ष मृदंग वाजवून जी-२० परिषदेत पाहुण्यांच करणार स्वागत, पहा विशेष मुलाखत
  2. Mumbai News: आपल्या बासरीच्या स्वरांनी मुंबईकरांना खिळवून ठेवणारा कलाकार, इरशाद शेख
  3. Flute Player Parmeshwar Pune : भर उन्हात पुणेकरांना आपल्या मधुर बासरीच्या सुराने मंत्रमुग्ध करणारा 'परमेश्वर'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.