ETV Bharat / state

औद्योगिक वसाहतीतील नॅशनल फर्निचर कंपनीला आग; जीवितहानी नाही

अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पर्यत सुरू केले आहेत. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

author img

By

Published : Mar 24, 2019, 3:27 PM IST

नॅशनल फर्निचर कंपनीला लागलेली आग

पालघर -पूर्व पालघरच्या गणेश नगर, औद्योगिक वसाहत परिसरातील नॅशनल फर्निचर कंपनीला अचानक आग लागली आहे. या आगीत कंपनीतील साहित्य जळून खाक झाले आहे. आग लागल्यानंतर तत्काळ अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पर्यंत सुरू केले आहेत. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नॅशनल फर्निचर कंपनीला लागलेली आग

पूर्व पालघर परिसरात नॅशनल फर्निचर कंपनी आहे. या कंपनीत असलेल्या केमिकल टँकरला अचानक आग लागली. त्या आगीने आजूबाजूला असलेल्या साहित्याचा पेट घेतला. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी आग पाहून अग्निशामक दलाला पाचरण केले. अग्निशामक दलही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप आगीवर आटोक्यात आलेली नाही. या परिसरात बऱ्याच मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

गणेश नगर औद्योगिक वसाहत परिसरातील नॅशनल फर्निचर या कंपनीला आग

नमित पाटील,
पालघर,दि.24/3/2019 

पालघर पूर्व मधील गणेश नगर औद्योगिक वसाहत परिसरातील नॅशनल फर्निचर या कंपनीला आग लागून कंपनी भस्मसात झाली आहे.कंपनीत असलेल्या केमिकल टँकरला आग लागली असून, आगीचे मोठे लोळ सुरू असून आग थांबण्याचे नाव घेत नाही, कम्पनित मोठे स्फोट  होत आहेत.अद्यपहि कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचा अंदाज आहेत.

परिसरात बऱ्याच मोठ्या कंपन्या असून या कंपनिही आगिच्या तावडित येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे घटनास्थळी अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला असून आग विझविण्यास सुरुवात केली आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.