ETV Bharat / entertainment

'भूल भुलैया 3' चं टॉप सिक्रेट : क्लायमॅक्समध्ये काय दडलंय कलाकारांसह टीमलाही नाही पत्ता - BHOOL BHULAIYAA 3

Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यन अभिनीत 'भूल भुलैया 3' चित्रपटाचं मोठं रहस्य दिग्दर्शकानं गुलदस्त्यात ठेवलंय. वाचा सिनेमाचं टॉप सिक्रेट.

Bhool Bhulaiyaa 3
भूल भुलैया 3 (Etv Bharat (Etv Bharat))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 11, 2024, 5:36 PM IST

मुंबई - Bhool Bhulaiyaa 3: अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाचा नवीन ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरनं प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अवघ्या 24 तासात 155 दशलक्ष पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, ज्यामुळे तो आतापर्यंतचा सर्वात जास्त पाहिला गेलेला ट्रेलर बनला आहे. 'भूल भुलैया 3' चित्रपटाविषयीची उत्सुकता खूप वाढत आहे. अलीकडेच एका मुलाखतीत दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी म्हटलं होतं, "लोक आश्चर्यचकित होतील आणि विचार करतील, 'अरे देवा!' यांनी एक चांगला आणि सुंदर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे, मी दोन वेगवेगळ्या एंडिंग निवडल्या आहेत, हे प्रोडक्शन टीमच्या लोकांना देखील माहित नाही की, मी कुठली एंडिंग निवडणार आहे."

मंजुलिका आणि रूह बाबाचा संघर्ष :अनीस बज्मी यांनी 'भूल भुलैया 3' चित्रपटावर खूप मेहनत घेतली आहे. 'भूल भुलैया 3'च्या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन पुन्हा रूह बाबा भूमिकेत दिसत आहे, याशिवाय जुनी मंजुलिका विद्या बालन ही रूह बाबाबरोबर संघर्ष करत आहे. कलाकारांमध्ये तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित, राजपाल यादव तसेच अश्विनी कालसेकर, संजय मिश्रा यांसारख्या कलाकारांचा देखील समावेश आहे. 'भूल भुलैया 3'चा ट्रेलर चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. अनीस बज्मी यांनी कलाकारांना स्क्रिप्टची शेवटची 15 पाने दिली नाहीत, कारण त्यांना प्रेक्षक आणि कलाकार दोघांसाठी रहस्य निर्माण करायचे होते.

रुपेरी पडद्यावर होणार टक्कर : 'भूल भुलैया 3'ची शूटिंग करताना त्यांनी क्रूच्या एका छोट्या गटाला सेटवर येण्याची परवानगी दिली होती. अनीस बज्मी दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित हा बहुप्रतीक्षित रुपेरी पडद्यावर 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय याच दिवशी 'सिंघम अगेन देखील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. हॉरर आणि विनोदानं भरलेल्या 'भूल भुलैया 3' रुपेरी पडद्यावर चांगलीच कमाई करेल असं सध्या दिसत आहे. या चित्रपटाच्या रिलीजची वाट अनेकजण पाहत होते. 'भूल भुलैया 3' चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांचा एकत्रित डान्स देखील दाखविण्यात येणार आहे.

हेही वाचा :

  1. 'भूल भुलैया 3'च्या ट्रेलरनं रचला इतिहास, व्ह्यूजच्या बाबतीत 'सिंघम अगेन'लाही टाकलं मागं
  2. 'भूल भुलैया 3' ट्रेलरमध्ये पाहा मंजुलिकाचा थरार आणि रुहबाबाचा निकराचा मुकाबला
  3. पुन्हा एकदा मंजुलिकाची दहशत सुरु, 'भूल भुलैया 3'चा टीझर प्रदर्शित - bhool bhulaiyaa 3

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.