पालघर - गडचिंचले हत्याकांड प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने डहाणू येथील न्यायालयात दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले. गावात चोर आल्याच्या संशयातून जमावाने 16 एप्रिलला दोन साधू व वाहन चालकाची निर्घृण हत्या केली. या हत्येने सर्वत्र खळबळ माजली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गृह विभागाने हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविले. या प्रकरणी 165 जणांना अटक करण्यात आली असून यातील 11 अल्पवयीन आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या तीन महिन्यात या प्रकरणी तपास पूर्ण करून बुधवारी आरोपपत्र दाखल केले. सीायडीकडून तब्बल 4 हजार 955 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
ही घटना 16 एप्रिल रोजी रात्री घडली तर या प्रकरणी 17 एप्रिल रोजी गुन्ह्याची नोंद झाली होती. 90 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करणे क्रमप्राप्त असल्याने मुदतीत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
न्यायालयमाध्ये सीायडीकडून 4 हजार 955 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. तीन जणांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने 808 जणांना संशयित ठरवले आहे तर 118 जण साक्षीदार असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत 154 जणांना अटक केली असून एकाही आरोपीला जामीन मंजूर झालेला नाही. सीआडीचे पोलीस उपअधीक्षक विजय कुमार या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत.
आरोपींविरोरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, आयपीसी, साथरोग कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीआयडीकडून या प्रकरणात प्रसिद्ध वकिल सतिश मानेशिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गडचिंचले प्रकरण -
16 एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्या प्रकरणात 165 आरोपींना अटक करण्यात आली असून यातील 11 जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 7 मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. पालघरचे पोलीस अधीक्षक म्हणून दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सुरू आहे.