पालघर - पोलीस ठाण्यातील 4 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात एका पोलीस अधिकाऱ्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे, पालघर पोलीस दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 652 झाली आहे.
उमरोळी येथील एका आरोपीस पालघर पोलिसांनी अटक केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक केल्यानंतर या आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. यानंतर आरोपीची कोरोना तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. यामुळे, कोरोनाबाधित आरोपीच्या संपर्कात आलेल्या 18 पोलिसांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांच्या घशाचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले. या सर्वांचे कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले असून एका पोलीस अधिकार्यासह 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, उर्वरित 14 पोलिसांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 652 झाली असून, 12 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 321 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 319 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
पालघर पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव, एका अधिकाऱ्यासह चौघांना लागण - पालघर पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव
उमरोळी येथील एका आरोपीस पालघर पोलिसांनी अटक केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक केल्यानंतर या आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. यानंतर आरोपीची कोरोना तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते.