ETV Bharat / state

वन अधिकाऱ्याची दबंगगिरी.. मजुरीचे पैसे मागायला आलेल्या आदिवासी मजुरांवर रोखले पिस्तूल - wada police

विक्रमगड तालुक्यातही या अधिकाऱ्याच्या दबंगगीरीचे किस्से जोरदार चर्चीले जात असतात. अनेक सामान्य आदिवासी नागरिकांना नाहक पिस्तुलाचा धाक दाखवत कारवाई केल्याच्या घटना घडल्या असून यासंदर्भात नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत.

मजुरीचे पैसे मागायला आलेल्या आदिवासी मजुरांवर रोखले पिस्तूल
author img

By

Published : Apr 24, 2019, 1:21 PM IST

पालघर - वाडा येथील वनविभाग (पश्चिम) कार्यालयाच्या क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम काही आदिवासी मजुरांनी केले होते. त्या कामाची मजुरी मागण्यासाठी गेलेल्या मजुरांवर वनविभाग पश्चिमचे प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे यांनी आपल्याकडील पिस्तूल रोखत दबंगगिरी केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मजुरीचे पैसे मागायला आलेल्या आदिवासी मजुरांवर रोखले पिस्तूल

वाडा तालुक्यातील वनविभाग (पश्चिम) कार्यालयांतर्गत येणाऱ्या आबिटघर परिसरातील वनक्षेत्रात शासनाच्या वृक्ष लागवडीच्या अभियानाकरिता खड्डे खोदण्याचे काम हाती घेण्यात आले होते. डिसेंबर २०१८ मध्ये आबिटघर येथील भरत गोविंद जाधव, भाग्यश्री भरत जाधव, आंबो बापू खुताडे, सखाराम गोविंद जाधव या मजुरांनी येथे काम केले. मात्र, वनविभागाने आजवर त्यांना या कामाची मजुरी दिली नाही. हे आदिवासी मजूर मंगळवारी वनविभाग (पश्चिम) कार्यालयात गेल्या ४ महिन्यांपासून आपली मजुरी का मिळत नाही याची विचारणा करण्यासाठी गेले असता, वन परिक्षेत्र अधिकारी तोंडे यांनी मजुरीचे पैसे देण्याऐवजी या मजूरांवर थेट पिस्तुल रोखून धमकावल्याची गंभीर घटना घडली.

घटनेने भयभीत झालेल्या या आदिवासी मजूरांनी श्रमजीवी संघाटनेच्या नेतृत्वाखाली वाडा पोलीस ठाणे गाठले. सायंकाळी उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्यासाठी हे मजूर व श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ पोलिस ठाण्यात बसून होते. त्यानंतर या वनधिकऱ्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली.
दरम्यान, तोंडे हे विक्रमगड येथे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असून, वाडा वनविभाग (पश्चिम) चा अतिरिक्त प्रभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. विक्रमगड तालुक्यातही त्यांच्या दबंगगीरीचे किस्से जोरदार चर्चीले जात असतात. अनेक सामान्य आदिवासी नागरिकांना नाहक पिस्तुलाचा धाक दाखवत कारवाई केल्याच्या घटना घडल्या असून यासंदर्भात नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत.

Intro: आदिवासी मजुरांवर वन अधिकाऱ्याची दबंगगिरी

मजुरीचे पैसे मागायला गेलेल्या मजूरांवर रोखले पिस्तूलBody: आदिवासी मजुरांवर वन अधिकाऱ्याची दबंगगिरी

मजुरीचे पैसे मागायला गेलेल्या मजूरांवर रोखले पिस्तूल

नमित पाटील,
पालघर, दि.24/4/2019

वाडा येथील वनविभाग ( पश्चिम) कार्यालयाच्या क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम काही आदिवासी मजुरांनी काम केले होते. त्या कामाची मजुरी मागण्यासाठी गेलेल्या मजुरांवर वनविभाग पश्चिमचे प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे यांनी आपल्याकडील पिस्तूल रोखत दबंगगिरी केल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.

वाडा तालुक्यातील वनविभाग ( पश्चिम) कार्यालया अंतर्गत येणाऱ्या आबिटघर परिसरातील वनक्षेत्रात शासनाच्या वृक्षलागवडीच्या अभियानाकरिता खड्डे खोदण्याचे काम हाती घेण्यात आले होते. डिसेंबर २०१८ मध्ये आबिटघर येथील भरत गोविंद जाधव, भाग्यश्री भरत जाधव, आंबो बापू खुताडे, सखाराम गोविंद जाधव या मजुरांनी येथे काम केले, मात्र वनविभागाने आजवर त्यांना या कामाची मजुरी दिली नाही. हे आदिवासी मजूर मंगळवारी वनविभाग ( पश्चिम) कार्यालयात गेल्या चार महिन्यापासून आपली मजुरी का मिळत नाही याची विचारणा करण्यासाठी गेले असता, वन परिक्षेत्र अधिकारी तोंडे यांनी मजुरीचे पैसे देण्याऐवजी या मजूरांवर थेट पिस्तुल रोखून धमकावल्याची गंभीर घटना घडली.

घटनेने भयभीत झालेल्या या आदिवासी मजूरांनी श्रमजीवी संघाटनेच्या नेतृत्वाखाली वाडा पोलीस ठाणे गाठले असून सायंकाळी उशीरापर्यंत तक्रार नोंदविण्यासाठी हे मजूर व श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ पोलिस ठाण्यात बसून होते, त्यानंतर या वनधिकऱ्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली.

दरम्यान तोंडे हे विक्रमगड येथे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असून, वाडा वनविभाग ( पश्चिम ) चा अतिरिक्त प्रभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला असून विक्रमड तालुक्यातही त्यांच्या दबंगगीरीचे किस्से जोरदार चर्चीले जात असून, अनेक सामान्य आदिवासी नागरिकांना नाहक पिस्तुलाचा धाक दाखवत कारवाई केल्याच्या घटना घडल्या असून यासंदर्भात नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.