पालघर - समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने ५ जणबुडाल्याची घटना घडली आहे. अर्नाळा समुद्र किनारी दुपारी ३ वाजता हा अपघातघडला. बुडालेल्यांमध्ये १ पुरूष आणि ४ महिलांचा समावेश आहे. हे सर्व वसई अंबाडी येथील असल्याची माहिती मिळते आहे.
वसई अर्नाळाचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ५ जणांपैकी एकाचा मृतदेह सापडला असूनउर्वरीत ४ जणांचा शोध पालघर जिल्हा पोलीस दलांच्या स्पीड बोटमधून चालू आहे.
बुडालेल्यांची नावे
1) निशा मौर्या (वय, ४० वर्ष रा. अंबाडी रोड वसई पश्चिम)
2) प्रिया मौर्य (वय, १८ वर्षे अंबाडी रोड वसई पश्चिम)
3) कांचन गुप्ता (वय, ३८ रोड वसई पश्चिम)
4) शितल गुप्ता (वय, ३२ रा. अंबाडी रोड वसई पश्चिम)
5) प्रशांत मौर्य (वय, २० वर्ष) मृतदेह सापडला आहे.