ETV Bharat / state

पालघरात मुसळधार; मासेमारी लांबणीवर - uttan

पालघर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे 1 ऑगस्टपर्यंत थांबलेली मासेमारी 5 ऑगस्टपर्यंत लाबली आहे.

पालघरात मुसळधार
author img

By

Published : Aug 3, 2019, 4:48 AM IST

Updated : Aug 3, 2019, 5:39 AM IST

पालघर (वाडा) - पावसाने पालघर जिल्ह्यात थैमान घातले आहे. वादळी पावसामुळे वाडा व पालघर तालुक्यात घर पडझडीच्या घटना व घराच्या छताच्या नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. 5 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे मासेमारांना समुद्रात न जाणाच्या इशारा देण्यात आला आहे.

पालघरात मुसळधार

त्यामुळे मत्सव्यवसायीकांची मासेमारीसाठी समुद्रात केलेली 1 ऑगस्टची बंदी अजून 5 दिवसापर्यंत वाढविण्यात आली आहे. तसे परिपत्रकही मत्सव्यवसायीका सोसायटीचे सहआयुक्त मत्सव्यवसाय ठाणे-पालघर यांच्याकडून 2 ऑगस्ट रोजी काढण्यात आले आहे. त्यामुळे मासेमारीसाठी वसई, एडवण, सातपाटी, उत्तन, डहाणू याभागातील मत्सव्यवसायीकांना अजून वाट पहावी लागणार आहे.

पालघर जिल्ह्य़ात वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. तसेच अतिरिक्त पावसामुळे शेतीची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी लागवडीची कामे सुरू आहेत. अशातच हवामान खात्याने 5 ऑगस्टपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. शेती कामाबरोबर सागरी किनार्‍यावरील मत्सव्यवसाय काही काळ रखडण्याची शक्यता आहे.
पावसामुळे पालघर जिल्ह्य़ातील धामणी धरणाचे 2 ऑगस्ट रोजी 5 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 11 हजार 18 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडलेला विसर्ग यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Intro:पावसाचा कहर जारी वादळी पावसामुळे घरांचे नुकसान
आणि मत्सव्यवसाय अजुन लांबणीवर

पालघर (वाडा)- संतोष पाटील
पावसाने पालघर जिल्ह्यात धुंवाधार बॅटींग सुरू केली आहे.या वादळी पावसामुळे वाडा व पालघर तालुक्यात घर पडझडीच्या घटना व घराच्या छताच्या नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. 5 व ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.त्यामुळे मत्सव्यवसायीकांची मासेमारीसाठी समुद्रात केलेली 1 ऑगस्टची बंदी अजून 5 दिवसापर्यंत लांबविण्यात आली आहे. तसे परिपञकही मत्सव्यवसायीका सोसायटीने सहआयुक्त मत्सव्यवसाय ठाणे -पालघर यांच्याकडून 2 ऑगस्ट रोजी काढण्यात आलं आहे. त्यामुळे मासेमारीसाठी वसई,एडवण,सातपाटी,उत्तन, डहाणू याभागातील मत्सव्यवसायीकांना अजून वाट पहावी लागणार आहे.
पालघर जिल्ह्य़ात वादळी वा-यासह पावसाने थैमान घातले आहे.या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे.तसेच अतिरिक्त पावसामुळे शेतीची कामे रखडली आहेत काही ठिकाणी लागवडीची कामे सुरू आहेत. अशातच हवामान खात्याने अजून 5 ऑगस्टपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.शेती कामाबरोबर सागरी किनार्‍यावरील मत्सव्यवसाय ही काही काळ रखडण्याचा बेतात आहे.
पावसामुळे पालघर जिल्ह्य़ातील धामणी धरणाचे 2 ऑगस्ट रोजी पाच गेट हे उघडण्यात आले असुन धरणातून 11018 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जशी या पावसाची मुदतवाढ होत आहे तसा जनसामान्यांच्या जीव भीतीने कासावीस होत आहे. Body:पालघरच्या सागरी किनारी जोराचा पाऊसConclusion:Ok
Last Updated : Aug 3, 2019, 5:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.