पालघर/वसई : वसईच्या एव्हरशाईन परिसरातील स्टार रेशिडेन्सीमधील सातव्या मजल्यावरील एका घराला भीषण आग लागली आहे. आगीत दुमजली घर पूर्णपणे जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घरात पेटवलेल्या धुपाने (लोबन) ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक रहिवाशांकडून मिळाली आहे. आज संध्याकाळी साडेसहा वाजताची ही घटना असून वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यात यश मिळवले आहे.