ETV Bharat / state

Fire at Virar : विरारच्या एचडीआयएल इंडस्ट्रीतील कंपनीला आग - अग्निशमन दल

एचडीआयएल औद्योगिक ( Fire at Virar HDIL Industry Company ) वसाहतीतील नेलपॉलिश बनवणाऱ्या एका कंपनीला शनिवारी ( fire nail polish manufacturing company ) सायंकाळी 7:30 सुमारास आग लागली.

A fire to a company in the industry
इंडस्ट्रीतील कंपनीला आग
author img

By

Published : Oct 15, 2022, 9:33 PM IST

Updated : Oct 15, 2022, 10:11 PM IST

विरार - चंदनसार रोड येथील एचडीआयएल औद्योगिक ( Fire at Virar HDIL Industry Company ) वसाहतीतील नेलपॉलिश बनवणाऱ्या एका कंपनीला शनिवारी ( fire nail polish manufacturing company ) सायंकाळी 7:30 सुमारास आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाल्याची माहिती आहे. कंपनी बंद असल्याने सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही. कंपनीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साठा करून ठेवल्याचे अग्निशमन दलाच्या ( fire brigade ) निदर्शनास आले आहे.

Fire at Virar
Personnel fighting fire
आग विझवतांना कर्मचारी

केमिकलने घेतला अचानक पेट - विरार पूर्व चंदनसार रोडवरील एचडीआयएल औद्योगिक वसाहतीतील वर्टेक्स एज टेक कंपनीचा 24 क्रमांकाचा गाळा आहे. मुख्य कंपनी भाईंदर येथे असली तरी विरार-एचडीआयएल औद्योगिक वसाहतीतील गाळ्यात नेलपॉलिशसाठी लागणारे रंग, केमिकल साठवून ठेवण्यात आलेले होते. शनिवारी सायंकाळी या गाळ्यातील केमिकलने अचानक पेट घेतला. बंद गाळ्यांतून आगीचे लोट उठल्याचे दिसताच; बाजूच्या कंपन्यांतील कामगारांनी याबाबतची माहिती विरार अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र नेलपॉलिश बनवण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल या आगीत जळाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. सात-आठ महिन्यांपूर्वी याच औद्योगिक वसाहतीतील पेपर कंपनीलाही अशाच प्रकारे आग लागली होती.

The company burned thirty materials
कंपनीतीस साहित्य जळून खाक

औद्योगिक वसाहतींत कंपन्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर - या आगीच्या निमित्ताने औद्योगिक वसाहतींत सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटना पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. 28 सप्टेंबर रोजी वसई-वाकीपाडा औद्योगिक वसाहतीतील कॉश पावर इंजीनियरिंग लिमिटेड ( COSH POWER ENGINEERING LIMITED ) कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन कामगारांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर नऊ जण गंभीर जखमी झाले होते.

Last Updated : Oct 15, 2022, 10:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.